Homeदेश

एसआयआर मोहिमेत मुंबई-पुणे पिछाडीवरमराठवाड्यासह विदर्भ मात्र आघाडीवर ; हिंगोलीने फॉर्म वितरणात, तर चंद्रपूर डिजिटल नोंदणीत अव्वल

मुंबई : राज्यातील मतदार यादी विशेष पुनर्पडताळणी मोहिमेचा वेग वाढत असला, तरी विविध जिल्ह्यांतील कामगिरीत मोठी तफावत स्पष्टपणे दिसून येत आहे. 10 जु

मतदार यादी पुनरिक्षण मोहीम राष्ट्रहिताची : पालकमंत्री विखे 
मतदार पडताळणीसाठी बीएलओंनी घरोघरी जावेग्राहक पंचायतची मागणी
एसआयआर 2026 मोहिमेत नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा; प्रा. सय्यद शफीक हाश्मी यांचे आवाहनअचूक मतदार यादीसाठी बीएलओंना सहकार्य करा; बुंदेलपुरा येथील जनजागृती कार्यक्रमात नागरिकांना मार्गदर्शन


मुंबई : राज्यातील मतदार यादी विशेष पुनर्पडताळणी मोहिमेचा वेग वाढत असला, तरी विविध जिल्ह्यांतील कामगिरीत मोठी तफावत स्पष्टपणे दिसून येत आहे. 10 जुलै 2026 पर्यंतच्या अधिकृत आकडेवारीनुसार, राज्यातील सुमारे 9 कोटी 78 लाख मतदारांपर्यंत पोहोचण्याच्या या व्यापक उपक्रमात मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांनी उल्लेखनीय प्रगती केली आहे. दुसरीकडे, मोठे मनुष्यबळ, प्रगत सुविधा आणि अधिक यंत्रणा उपलब्ध असूनही मुंबई, ठाणे आणि पुणे या प्रमुख जिल्ह्यांची प्रगती अपेक्षेपेक्षा मंद असल्याचे चित्र आहे.
या मोहिमेची अंतिम मुदत 29 जुलै असून, त्याआधी राज्यातील प्रत्येक पात्र मतदारापर्यंत आवश्यक अर्ज पोहोचवणे आणि त्याची डिजिटल नोंद पूर्ण करणे हे प्रशासनासमोरचे मोठे आव्हान आहे. आतापर्यंत राज्यभरात अर्ज वितरणाची सरासरी 52.50 टक्के, तर डिजिटल नोंदीचे प्रमाण 9.32 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्याने अर्ज वितरणात राज्यात सर्वाधिक 99.76 टक्के प्रगती नोंदवत प्रथम क्रमांक मिळवला आहे. तुलनेने कमी मनुष्यबळ असूनही जिल्हा प्रशासनाने जवळपास सर्व मतदारांपर्यंत अर्ज पोहोचवले आहेत. डिजिटल नोंदीच्या कामात विदर्भातील चंद्रपूर जिल्हा आघाडीवर असून, तेथे 28.67 टक्के अर्जांची संगणकीय नोंद पूर्ण झाली आहे. याशिवाय यवतमाळनेही 20.76 टक्के डिजिटल नोंदी करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. राज्यात सर्वाधिक मतदार असलेल्या मुंबई उपनगर, ठाणे आणि पुणे या जिल्ह्यांची कामगिरी मात्र समाधानकारक नसल्याचे दिसते. मुंबई उपनगरात अर्ज वितरणाचे प्रमाण केवळ 12.91 टक्के असून, ठाण्यात ते 23.67 टक्क्यांपर्यंत मर्यादित आहे. डिजिटल नोंदीत ठाणे अवघ्या 1.40 टक्क्यांवर असून राज्यात सर्वात शेवटच्या क्रमांकावर आहे. मुंबई उपनगरातही हे प्रमाण फक्त 1.88 टक्के आहे.

COMMENTS