Homeताज्या बातम्या

माजी खा. विनायक राऊतांच्या सुनेचे छळाचे गंभीर आरोपगुन्हा दाखल ; सर्व आरोप निराधार असल्याचे राऊतांचे स्पष्टीकरण

मुंबई : ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार विनायक राऊत, त्यांचा मुलगा गितेश राऊत आणि कुटुंबातील अन्य सदस्यांविरोधात गिरीजा राऊत यांनी केलेल्य

बॅगेत बॉम्ब ठेवल्याचा फेक कॉल करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल.
हरित हायड्रोजन प्रायोगिक प्रकल्पाचे उद्घाटन
Osmanabad : सिना कोळेगाव धरण भरण्याच्या मार्गावर धरण काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा (Video)
म्हणून माझ्यावर खोटे आरोप केले; सूनेने ठाण्यात गुन्हा दाखल करताच विनायक राऊत यांचे स्पष्टीकरण - Tarun Bharat


मुंबई : ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार विनायक राऊत, त्यांचा मुलगा गितेश राऊत आणि कुटुंबातील अन्य सदस्यांविरोधात गिरीजा राऊत यांनी केलेल्या तक्रारीनंतर या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. गिरीजा राऊत यांच्या तक्रारीच्या आधारे कापूरबावडी पोलीस ठाण्यात कौटुंबिक छळासह अंधश्रद्धा आणि अमानुष प्रथांविरोधी कायद्यातील तरतुदींनुसार गुन्हा नोंद झाल्याची माहिती आहे. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत गिरीजा राऊत यांनी सासरच्या कुटुंबावर अनेक गंभीर आरोप केले. मात्र, हे सर्व आरोप विनायक राऊत यांनी ठामपणे फेटाळून लावत प्रकरण न्यायालयात असल्याचे सांगितले.
पत्रकार परिषदेत गिरीजा राऊत यांनी सांगितले की, विवाह ठरताना आणि त्यानंतरही अनेक बाबतीत आपल्याशी असत्य माहिती देण्यात आली. लग्नानंतर वास्तव परिस्थिती पूर्णपणे वेगळी असल्याचे समोर आले. आर्थिक, मानसिक, शारीरिक आणि भावनिक छळ अनेक वर्षे सहन करावा लागल्याचा आरोप त्यांनी केला. राजकीय प्रभाव असलेल्या कुटुंबामुळे आणि संसार टिकावा या अपेक्षेने आपण दीर्घकाळ कोणतीही तक्रार केली नाही. परिस्थिती सुधारेल, या आशेने सर्व काही सहन केले, मात्र तसे घडले नाही, असे त्यांनी सांगितले. गिरीजा राऊत यांनी दावा केला की, डिसेंबर 2017 मध्ये विवाह झाल्यानंतर बराच काळ पती-पत्नीचे शारीरिक संबंध प्रस्थापित झाले नाहीत. या विषयावर दोन्ही कुटुंबांमध्ये चर्चा झाली होती. त्यानंतर घडलेल्या घटनांना अघोरी उपचारांचे स्वरूप देण्यात आले, असा आरोप त्यांनी केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, सप्टेंबर 2018 ते 2022 या काळात विविध व्यक्तींकडे उपचाराच्या नावाखाली नेण्यात आले. जिवंत कोंबडा अंगावरून उतरवणे, कणकेच्या बाहुल्या, तांब्याची तार, माशांचे तुकडे, अंगावरील न धुतलेले कपडे, डोक्यातील केस वापरून उतारे करणे, तसेच गोमूत्र किंवा हळद खाण्यास सांगणे अशा विविध प्रकारांना सामोरे जावे लागल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी त्यांनी असा गंभीर आरोपही केला की, गितेश राऊत शारीरिक संबंध ठेवण्यास असमर्थ असल्याची बाब लपविण्यात आली आणि नियोजनपूर्वक आपले वैवाहिक आयुष्य उद्ध्वस्त करण्यात आले. गिरीजा राऊत यांनी माजी खासदार विनायक राऊत यांच्या भूमिकेवरही प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले. कुटुंबप्रमुख म्हणून त्यांनी आवश्यक जबाबदारी पार पाडली नाही, असा आरोप त्यांनी केला. या सर्व आरोपांवर प्रतिक्रिया देताना विनायक राऊत यांनी ते पूर्णपणे निराधार असल्याचा दावा केला. गितेश आणि गिरीजा गेल्या तीन वर्षांपासून वेगळे राहत असल्याचे त्यांनी सांगितले. 2018 मधील कथित घटनांबाबत 2026 मध्ये तक्रार करण्यात आली असून त्यामागे संशयास्पद बाबी असल्याचे त्यांनी म्हटले. प्रत्येक टप्प्यावर गिरीजा राऊत यांचे आई-वडील त्यांच्या सोबत होते, असेही त्यांनी नमूद केले.

COMMENTS