जामखेड : जामखेड-माहिजळगाव-श्रीगोंदा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८-डीवरील पाटोदा (गरडाचे) परिसरात रविवारी (दि. १९) पहाटे झालेल्या भीषण अपघातात द

जामखेड : जामखेड-माहिजळगाव-श्रीगोंदा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८-डीवरील पाटोदा (गरडाचे) परिसरात रविवारी (दि. १९) पहाटे झालेल्या भीषण अपघातात दोन शासकीय कर्मचाऱ्यांचा जागेवरच मृत्यू झाला. अपूर्ण अवस्थेतील महामार्ग, सुरू असलेली दुरुस्ती आणि एकेरी वाहतुकीमुळे हा अपघात घडल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, आयसर (एमएच-१४ बीजे-२२८३) आणि हुंडाई वेन्यू (एमएच-२० जीई-३५६२) कारची जामखेड तालुक्यातील पाटोदा (गरडाचे) परिसरात जोरदार धडक झाली. या अपघातात श्रीगोंदा तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक विकील बहुरे आणि कुकडी पाटबंधारे उपविभाग, करमाळा येथील मोजणीदार रामचंद्र बहुरे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.पाटोदा-रत्नापूर दरम्यान महामार्गावर पडलेल्या मोठ्या भेगांमुळे दुरुस्तीचे काम सुरू आहे. या कामासाठी एका बाजूची वाहतूक बंद करून केवळ एका लेनवरून वाहने सोडण्यात येत होती. स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, श्रीगोंद्याच्या दिशेने येत असलेल्या हुंडाई वेन्यू कारला समोरून येणाऱ्या आयसरने जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला.अपघाताची माहिती मिळताच १०८ रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाली. जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर दोघांनाही मृत घोषित केले.अपघाताची माहिती मिळताच जामखेड पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अपघाताचा पुढील तपास पोलीस नाईक प्रवीण इंगळे करीत आहेत.दरम्यान, अपघातग्रस्त वाहने टोचनच्या सहाय्याने जामखेड येथे हलविण्यात आली. महामार्गाचे काम अनेक वर्षांपासून संथगतीने सुरू असल्याची नागरिकांची तक्रार आहे. नव्याने तयार करण्यात आलेल्या रस्त्यावरही मोठमोठ्या भेगा पडल्याने अनेक ठिकाणी पुन्हा दुरुस्तीची कामे सुरू आहेत. त्यासाठी रस्ता खोदून एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात आल्यामुळे वाहनचालकांचा जीव धोक्यात येत असून, यापूर्वीही या मार्गावर अनेक अपघात झाले आहेत .कंत्राटदाराच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह?या भीषण अपघातानंतर संबंधित कंत्राटदाराच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. महामार्गावरील दुरुस्तीची कामे तातडीने व सुरक्षित पद्धतीने पूर्ण करून वाहनचालकांच्या सुरक्षिततेची हमी द्यावी. तसेच निष्काळजीपणा करणाऱ्या संबंधित कंत्राटदाराची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांनी केली आहे.

COMMENTS