Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संजीवनी सैनिकी शाळेत चांद्रयान-3 मोहिमेचे जल्लोषात स्वागत

विद्यार्थ्यांनी अनुभवले प्रत्यक्ष सॉॅफ्टलॅडिंगचे प्रक्षेपण

कोपरगांव .प्रतिनिधी ः बुधवारी,दि.23ऑगस्ट रोजी सायंकाळी जगभरातील अब्जावधी लोकांना ज्याची प्रतिक्षा होती तो सुवर्णक्षण अवतरला. या सुवर्णक्षणाची संज

संवत्सरचे सुनील भाकरे यांची राष्ट्रपती शिक्षक पुरस्कारासाठी निवड
भिडे वाड्याच्या संवर्धनासाठी 50 कोटींची तरतूद  
 फिरत्या वैद्यकीय सेवेमुळे गोरगरीब घटकांचे आरोग्य सुदृढ – चांदगुडे महाराज

कोपरगांव .प्रतिनिधी ः बुधवारी,दि.23ऑगस्ट रोजी सायंकाळी जगभरातील अब्जावधी लोकांना ज्याची प्रतिक्षा होती तो सुवर्णक्षण अवतरला. या सुवर्णक्षणाची संजीवनी सैनिकी स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे कॅडेट्सही मोठ्या उत्कंठेने वाट पहात होते. चांद्रयान-3 च्या विक्रम लॅन्डरचे बुधवारी संध्याकाळी 6 वाजुन 4 मिनिटांनी चंद्राच्या पृष्ठभागावर सॉॅफ्टलॅडिंग झाले. या संपुर्ण घटनेचे प्रक्षेपण विद्यार्थ्यांनी सायंकाळी 5.45  ते 6.10 या वेळेत अनुभवले.  गुरूवारी,दि.24 ऑगस्टच्या सकाळी चांद्रयान -3 यशस्वी मोहिमेचा आनंदोत्सव स्कूलच्या प्रांगणात मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.
सदरील आनंदोत्सव प्रसंगी डायरेक्टर (नॉनअकॅडमिक) ज्ञानेश्‍वर  सांगळे, उपप्राचार्य  कैलास दरेकर व शिक्षक  आणि विद्यार्थी मोठ्या  संख्येने उपस्थित होते. या आनंदोत्सवात सर्व प्रथम संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष  नितिीन कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे व विश्‍वस्त   सुमित कोल्हे यांच्या वतीने भारतीय अंतराळ संस्थेच्या (इस्त्रो) शास्त्रज्ञांचा अभिनंदनाच्या ठरावाचे वाचन  दरेकर यांनी केले.आनंदोत्सव प्रसंगी  सांगळे यांनी सांगीतले की, चांद्रयान-3 मोहिमेच्या माध्यमातुन दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा पहिला देश  ठरला आहे. हे यश  भारतीय अंतराळ संस्था इस्त्रो, चंद्रयान मोहिमेसाठी झटणारे शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ तसेच त्यांच्या पाठीशी  उभे राहणार्‍या  सरकारचे आणि वैज्ञानिक दृष्टीकोनावर विश्‍वास  ठेवणार्‍या कोट्यावधी  भारतीयांचे आहे.सदर प्रसंगी दरेकर यांनी चांद्रयान मोहिमेविषयी विध्यार्थ्यांना माहिती दिली. तसेच कलाशिक्षक अविनाश  भोसले यांनीही चंद्रयानची प्रतिकृती तयार करून ही मोहिम कशी राबविण्यात आली. या विषयी सांगीतले. याबद्दल त्यांचा सत्कारही करण्यात आला.  संतोष  सुर्यवंशी  यांनी सुत्रसंचालन करून आभार मानले.

COMMENTS