Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्रीगोंदा नगरपालिकेतील नगरसेवकांची संख्या वाढणार

प्रभागसंख्या 2 तर नगरसेवक 3 ने वाढणार

श्रीगोंदा - श्रीगोंदा शहराची लोकसंख्या 2011 साली झालेल्या जणगणने नुसार 31 हजार होती.ती लोकसंख्या विचारात घेऊन नगरसेवकांची संख्या 19 ऐवजी 22 तर प्

नगर मर्चंटस् बँकेला 8 कोटीचा नफा
नगरमध्ये पहाटेच्या अजानच्या वेळेस भोंगे शांतच…
बांग्लादेशात हिंसाचार… महाराष्ट्रात आंदोलन (Video)

श्रीगोंदा – श्रीगोंदा शहराची लोकसंख्या 2011 साली झालेल्या जणगणने नुसार 31 हजार होती.ती लोकसंख्या विचारात घेऊन नगरसेवकांची संख्या 19 ऐवजी 22 तर प्रभाग संख्या 9 ऐवजी 11 करण्यात आली असल्याचे राजपत्र काढण्यात आल्याची माहिती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रमोद ढोरजकर यांनी दिला. या राजपत्रानुसार 14 जागा  सर्वसाधारण, अनुसूचित जाती 3 तर नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 5 जागा राखीव असणार आहेत.आरक्षित जागांपैकी अनुसूचित जाती तीन जागांपैकी 2 जागा महिला राखीव, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 5 जागा पैकी 3 जागा महिला राखीव,तर सर्व साधारण 14 जागा पैकी 6जागा महिला.अशा एकुण 22 पैकी 11जागा महिला साठी आरक्षित असणार आहेत. सध्या नगरपरिदेमधे 19 नगरसेवक व लोकनियुक्त नगराध्यक्षा असे 20 सदस्य कामकाज पाहत आहेत. नगरसेवक संख्या वाढल्याने निवडणुकीची तयारी करत असलेल्या अनेकांचे नगरसेवक होण्याचे स्वप्न साकार होणार आहे.

COMMENTS