Homeताज्या बातम्या

महाराष्ट्रात पुन्हा मान्सून सक्रिय! पुढील 24 तास महत्त्वाचे; ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज-यलो अलर्ट

मुंबई : राज्यात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून पुढील 24 तास हवामानाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहेत. भारतीय

मान्सून महाराष्ट्राच्या उंबरठ्यावरपुढील दोन-तीन दिवसांत आगमनाची शक्यता
पावसाळ्याची चाहूल, सावधगिरीची गरज : बीड जिल्ह्यात नागरिक, शेतकरी आणि पशुपालकांनी घ्यावयाची काळजी
मान्सून केरळमध्ये 26 मे रोजी होणार दाखल
Monsoon has arrived in Maharashtra rain news weather | Monsoon :  दिलासादायक! महाराष्ट्रात मान्सून दाखल

मुंबई : राज्यात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून पुढील 24 तास हवामानाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहेत. भारतीय हवामान विभागाने (IMD) महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी केला असून, विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.हवामान खात्याच्या अंदाजानुसार, कोकण, घाटमाथा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांत पुढील आठवडाभर हलका ते मध्यम, तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तर, पूर्व आणि ईशान्य भारतात मान्सून सक्रिय असून त्याचा परिणाम महाराष्ट्रातील हवामानावरही होत आहे.पुढील दोन ते तीन दिवस कोकण किनारपट्टी आणि घाटमाथा परिसरात मुसळधार पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे. काही भागांत मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.सातारा जिल्ह्यातील घाट परिसरासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.तर ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, पुणे (घाट भाग), अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, जालना, परभणी, लातूर, धाराशीव, सोलापूर आणि सांगली जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.20 जुलै रोजी पुणे आणि सातारा घाट परिसरात यलो अलर्ट कायम राहणार आहे. तसेच जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.नागरिकांना प्रशासनाचे आवाहनहवामान विभागाने नागरिकांना वादळी पाऊस आणि विजांच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शेतीची कामे नियोजनबद्ध करावीत, तर नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, असेही प्रशासनाने सांगितले आहे.

COMMENTS