Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अश्‍वमेधच्या अगदी स्वस्तात मिळणार आयुर्वेदिक औषधी ः डॉ. ज्ञानेश्‍वर वाघचौरे

कोपरगाव शहर प्रतिनिधी- आयुर्वेद अनेक रोगांना मुळापासून बरा करतो हे त्रिकाला बाधित सत्य आहे. परंतु त्यात काही औषधे कडू स्वादाची असतात त्यामुळे अने

अहमदनगरमध्ये नगरसेवकावर दिवसाढवळ्या गोळीबाराचा प्रयत्न
अवजड वाहने करतात नगरमध्ये वाहतूक कोंडी
तुमचे आजचे राशीचक्र, बुधवार ३० जून २०२१ l पहा LokNews24

कोपरगाव शहर प्रतिनिधी- आयुर्वेद अनेक रोगांना मुळापासून बरा करतो हे त्रिकाला बाधित सत्य आहे. परंतु त्यात काही औषधे कडू स्वादाची असतात त्यामुळे अनेक रुग्ण गोळ्या खाण्याचा कंटाळा करतात म्हणून त्याच समस्यावर कोपरगाव येथील अश्‍वमेध प्रकल्पाने स्वादिष्ट चवीला गोड व कमी दरात औषधी गोळ्यांचे उत्पादन सुरू केले असून या गोळ्या अगदी अल्प किंमतीत मिळणार असल्याची माहिती अश्‍वमेधचे संचालक ज्ञानेश्‍वर वाघचौरे यांनी दिली.              
वाकचौरे यांनी या विषयी अधिक माहिती देतांना सांगितले की, सर्दी खोकल्यासाठी कफेक्स गोळी, 1 ते 2 मिनिटात ऍसिडिटी घालवणारी  रिफलेक्स गोळी, कब्ज, अपचन त्यामुळे डोकेदुखी व शौचास त्रास होणे या आजारावर व मुळव्याधीस कारणीभूत ठरणार्‍या वेदनांवर केवळ 2 ते 3 दिवसात आणि केवळ 20 रुपयाच्या आत आराम देणारी रेक्टीमॅक औषध आदी सर्व बहुगुणी गोळीची प्रक्रिया आयुर्वेदिक पद्धतीने निर्मिती केल्या असून या देशी बनावटीची गोळ्या ग्राहकांसाठी बाजारात उपलब्ध झाल्या असून सर्दीतून श्‍वास महा रोग निमोनिया, दमा, पित्त विकारातून हृदयरोग, पोटाचे अल्सर, मूळव्याध, मधुमेह, किडनी विकार आदी रोगावर नियंत्रण आणण्यासाठी सदरची उत्पादने बहुपयोगी ठरतील असा विश्‍वास व दावा डॉ वाघचौरे यांना व्यक्त केला आहे. सदर प्रकल्पाच्या उभारणीत अहमदनगरचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे औषध निरीक्षक डॉ. ज्ञानेश्‍वर दरंदले यांचा विशेष सहकार्याने व मार्गदर्शनाखाली वैद्य डॉ अशोक गावित्रे व वैद्या सायली वाघचौरे यांनी उत्पादने विकासासाठी शास्त्रीय आधार देत त्यांना प्रमाणबद्ध केले आहे.तर उत्पादन प्रकल्प अधिकारी चांगदेव गव्हाणे तर प्रॉडक्ट डिझायनिंग साठी समर्थ वाघचौरे व विक्री आणि विपणनासाठी जयंत शर्मा यांनी विशेष योगदान दिले असल्याचे संचालक वाघचौरे यांनी सांगितले.

COMMENTS