Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कुकडी-सीना कालव्याचे उन्हाळी आवर्तन सोडाआ. रोहित पवारांचा पाठपुरावा ;  प्रशासनाकडे मागणी

कर्जत : तालुक्यासह परिसरात सध्या तीव्र उन्हाळ्याची झळ बसत असून शेतीपिके आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार

आक्रमक महिलांनी ग्रामपंचायतला ठोकले टाळे राहुरी खुर्दमध्ये पाणीप्रश्न पेटला ; तीव्र आंदोलन करण्याचा इशारा
देशव्यापी ‘औषध बंद’मध्ये कोपरगावमधील केमिस्टही सहभागी   
शिंगणापुरात बिबट्याची दहशत; शेळी फस्त
Rohit Pawar Claims Kharat Case Orchestrated; Friends Will Be Targeted

कर्जत : तालुक्यासह परिसरात सध्या तीव्र उन्हाळ्याची झळ बसत असून शेतीपिके आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर कुकडी आणि सीना कालव्यातून उन्हाळी आवर्तन तातडीने सोडण्यात यावे तसेच टेलपर्यंतच्या शेतकऱ्यांना न्याय्य पद्धतीने पाणी मिळावे, यासाठी आमदार रोहित पवार यांनी प्रशासनाकडे जोरदार पाठपुरावा सुरू केला आहे.यासंदर्भात आमदार रोहित पवार यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक यांना पत्र देऊन उन्हाळी आवर्तन तातडीने सुरू करण्याची मागणी केली आहे. तसेच कर्जत येथील दिनकर बंगला या ठिकाणी त्यांनी कृष्णा खोरे महामंडळाच्या अधिकाऱ्यांची आवर्तन सोडण्याबाबत तसेच सध्या असलेल्या पाणीसाठा बाबत बैठक घेतली आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आवर्तन सोडण्यासाठी भ्रमणध्वनीवरून संपर्क केला.कर्जत-जामखेड मतदारसंघातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासह शेती सिंचनाचा प्रश्न गंभीर बनला असून शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात मागणी होत असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.कुकडी डावा कालवा परिसरातील सुमारे ४८ गावांतील शेतकऱ्यांना या आवर्तनाचा मोठा लाभ होतो. सध्या उन्हाळी आवर्तन क्रमांक एक पूर्ण झाले असले तरी वाढत्या तापमानामुळे दुसरे आवर्तन तातडीने सुरू करणे आवश्यक असल्याचे आमदार पवार यांनी स्पष्ट केले आहे. शेतीपिके करपत असून जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण झाला असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.तसेच आवर्तनाचे योग्य नियोजन करून कालव्याच्या टेल भागातील शेतकऱ्यांनाही समान पाणी मिळेल याची दक्षता घ्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. अनेकदा शेवटच्या टोकावरील गावांपर्यंत पाणी पोहोचत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून केली जाते. त्यामुळे यावेळी नियोजनबद्ध पाणी वितरण करण्याची आवश्यकता असल्याचे आमदार पवार यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले.उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. प्रशासनाकडून लवकरच सकारात्मक निर्णय घेऊन आवर्तन सुरू केले जाईल, अशी आशा परिसरातील शेतकरी व्यक्त करत आहेत.

COMMENTS