मोहिखेड येथील जुन्या पिढीतील ज्येष्ठ नागरिक द्रौपदी व्यंकटराव सोळंके यांचे वयाच्या 104 व्या वर्षी दि. 4 मे 2026 रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या न

मोहिखेड येथील जुन्या पिढीतील ज्येष्ठ नागरिक द्रौपदी व्यंकटराव सोळंके यांचे वयाच्या 104 व्या वर्षी दि. 4 मे 2026 रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली होती. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ व तेरावीनिमित्त समस्त सोळंके परिवाराच्या वतीने धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
याअंतर्गत रविवार दि. 17 मे 2026 रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत हभप वासुदेव बाबा टाकळीकर महाराज यांचे सुश्राव्य कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. या कीर्तनातून अध्यात्म, भक्ती आणि समाजप्रबोधनाचा संदेश दिला जाणार असल्याने परिसरातील भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. कीर्तन सेवे नंतर उपस्थित भाविकांसाठी गोड जेवण व महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. या धार्मिक कार्यक्रमास परिसरातील नागरिक, नातेवाईक आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली.या कीर्तन सेवेचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सुरेश व्यंकटराव सोळंके, श्रीमंत व्यंकटराव सोळंके आणि मंजुळदास व्यंकटराव सोळंके यांनी केले आहे.

COMMENTS