Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शामगाव येथे पिण्याच्या पाण्याचे एटीएम

मसूर / वार्ताहर ः कोपर्डे हवेली, ता. कराड येथील जि. प. सदस्य निवासराव थोरात यांच्या प्रयत्नातून सातारा जिल्हा परिषदेच्या सेस निधीतून शामगांव येथे

विजेचा शॉक लागून महिलेचा मृत्यू
हृदय विकाराच्या धक्क्याने 23 वर्षाच्या पैलवानाचा कोल्हापूरात मृत्यू
गर्भवती वनरक्षक महिलेला माजी सरपंचाकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण

मसूर / वार्ताहर ः कोपर्डे हवेली, ता. कराड येथील जि. प. सदस्य निवासराव थोरात यांच्या प्रयत्नातून सातारा जिल्हा परिषदेच्या सेस निधीतून शामगांव येथे वॉटर एटीएमची उभारणी करण्यात आली. याचे उद्घाटन तसेच जिल्हा नियोजन विकास व लघु पाटबंधारे विभागामार्फत मंजूर झालेल्या बंधार्‍याचे भूमिपूजन जि. प. सदस्य निवासराव थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी सरपंच सौ. शीतल गायकवाड, ज्येष्ठ नेते भीमराव डांगे (पं. स. सदस्य ), रुपाली जाधव उपसरपंच, शैलेश चव्हाण उपाध्यक्ष युवक काँग्रेस सातारा, अमित जाधव उपाध्यक्ष युवक काँग्रेस सातारा, दादासो चव्हाण चेअरमन सिध्देवर विकास सोसायटी कोपर्डे हवेली, प्रवीण वेताळ उपाध्यक्ष युवक काँग्रेस कराड उत्तर, विवेक चव्हाण सरचिटणीस युवक काँग्रेस कराड उत्तर, राहुल थोरात, प्रकाश पिसाळ, सुनील गायकवाड, महेंद्र जाधव, विजय पाटील, रमेश गायकवाड, संजय पोळ चेअरमन विकास सोसायटी शामगाव, हणमंत पोळ अध्यक्ष तंटामुक्ती समिती, शंकर पोळ, जीवन मोहिते, संभाजी पोळ, बापूराव पोळ, शामराव वाघमारे, प्रफुल्ल जाधव, ज्ञानेश्‍वर पोळ व ग्रामस्थ उपस्थित होते.
बंधार्‍यासाठी 16 लाख रुपये तर वॉटर एटीएम करिता 3 लाख रुपये असा एकूण 19 लाख रुपये इतका निधी शामगांवसाठी जि. प. सदस्य निवासराव थोरात यांच्या प्रयत्नातून मंजूर झाला. शेतीला व पिण्याला मुबलक पाण्यासाठी गरजेचे असते. याच नियोजनातून व प्रयत्नातून जिल्हा परिषद सदस्य निवासराव थोरात यांनी बंधारा व ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याचे वॉटर एटीएम असे दोन महत्वपूर्ण उपक्रम राबवून त्याचे भूमिपूजन व उद्घाटन केले. बंधार्‍यामुळे शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न मिटेल तर ग्रामस्थांना शुध्द पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर एटीएम कल्पना राबविली गेली.
निवासराव थोरात यांनी पाण्याच्या प्रश्‍नावर बोलताना सांगितले, पाण्याचा प्रश्‍न मार्गी लावणे हे लोकप्रतिनिधीचे कर्तव्य असते. आतापर्यंत माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री असताना व नंतरही लाखो रुपयांचा निधी या माझ्या जिल्हा परिषद गटात आणता आला.
या कार्यक्रमाला राष्ट्रीय काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

COMMENTS