Homeताज्या बातम्या

बीड नगर परिषदेतील प्रतिनिधींकडून सतत महिन्यांच्या गनतीची उजळणी; मनाने नाही तर निदान दाखविल्यावर तरी कामे करा – एस.एम.युसूफ

बीड: शहरातील अस्वच्छता, तुडुंब भरलेल्या नाल्या, अनियमित पाणीपुरवठा आणि बंद पडलेल्या पथदिव्यांचे प्रश्न... समस्या कोणतीही असो, बीड शहरवासीयांनी नग

लूटमार करणारी टोळी जेरबंद; पाच आरोपींना अटक, बेलवंडी पोलिसांची धडक कारवाई
नांदेड विभागातील विशेष तिकीट तपासणी मोहिमेत ५४३ प्रकरणे निष्पन्न; ३.८१ लाखांचा महसूल वसूल
पेपरफुटी ‘सरकार’मुळे तरुणांचे भविष्य धोक्यात; माजी शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरातांचा घणाघात

बीड: शहरातील अस्वच्छता, तुडुंब भरलेल्या नाल्या, अनियमित पाणीपुरवठा आणि बंद पडलेल्या पथदिव्यांचे प्रश्न… समस्या कोणतीही असो, बीड शहरवासीयांनी नगरपालिकेत जाऊन जाब विचारला की सत्ताधारी असो वा विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधी, सगळेच जण ‘आम्हाला निवडून येऊन एवढेच महिने झाले’ अशी महिन्यांची उजळणी करू लागतात. हे पाहता मनाने नाही तर निदान नागरिकांनी समस्या दाखविल्यावर तरी कामे करा, असे परखड आवाहन मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी केले आहे.

बीड नगर परिषदेतील सत्ताधारी, विरोधी किंवा प्रशासन यांची अवस्था ही ‘नाचता येईना अंगण वाकडे’ अशी झाली आहे. काम करण्याची इच्छाशक्ती असणाऱ्याला महिने किंवा वर्षे लागणे तर दूर, काही दिवसच पुरेसे असतात. फक्त अंतर्मनात काम करायची धमक असावी लागते. हीच धमक अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे दाखवीत असल्याने त्या खात्याशी संबंधित असलेले उद्योग-व्यवहार हळूहळू वठणीवर येऊ लागले आहेत. त्यांना हे पद स्वीकारून जेमतेम काही महिने झाले आहेत, परंतु एक उच्चपदस्थ अधिकारी म्हणून त्यांनी अल्पकाळात आपली धमक दाखवून दिली. अशी धमक बीड शहरासाठी जनतेने निवडून दिलेले नगर परिषदेतील प्रतिनिधी आणि प्रशासन कधी दाखवणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

शहरातील लोकोपयोगी कामे करताना ‘आम्हाला निवडून येऊन एवढेच महिने झाले’ अशी उजळणी करणारे प्रतिनिधी स्वलाभासाठी मात्र सराईतपणे स्वतःच्या आर्थिक लाभाचे व्यवहार करताना दिसतात. तिथे मात्र ते नवीन असल्याचा दावा करत नाहीत. शहराच्या कामांसाठी महिन्यांची उजळणी करणाऱ्यांमध्ये फक्त पहिल्यांदाच निवडून आलेले नव्हे, तर दोन ते पाच वेळा निवडून आलेले अनेक महाभाग आहेत. त्यांना शहरातील प्रश्नांची खडान् खडा माहिती आहे. अशांनी तरी आपल्या अनुभवाला साजेल असे काम करावे. ज्येष्ठांसह प्रथमच निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी मनाने नाही तर निदान शहरवासीयांनी समस्या दाखवून दिल्यावर तरी त्वरित कामे करावीत, असे आवाहन एस.एम.युसूफ़ यांनी केले आहे.

COMMENTS