Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बीडमध्ये हिंदू नववर्षानिमित्त भव्य पालखी मिरवणूक व शोभायात्रा उत्साहात

बीड : हिंदू नववर्षाच्या स्वागतानिमित्त जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी संप्रदाय जिल्हा सेवा समिती, बीड यांच्या वतीने भव्य पालखी मिरवणूक व श

गेवराईत प्रशासनाचा बेजबाबदारपणा शिगेला; लिलाव रक्कम अडकली, तरुणाने जिल्हाधिकार्‍यांकडे आत्महत्येची परवानगी मागितली; तहसीलदारांसह सहा अधिकार्‍यांवर गंभीर आरोप; अडीच वर्षे पैसे न मिळाल्याने कर्जबाजारी तरुणाचा टोकाचा इशारा
तांबवा येथे जुन्या वादातून तरुणावर कत्तीने हल्ला,पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंद
ईद निमित्त मीडियातील गरजवंताना ‘ईद मुबारक किट’ वाटप  राजयोग फाउंडेशन व पत्रकार संघाचा स्तुत्य उपक्रम

बीड : हिंदू नववर्षाच्या स्वागतानिमित्त जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी संप्रदाय जिल्हा सेवा समिती, बीड यांच्या वतीने भव्य पालखी मिरवणूक व शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले.
ही मिरवणूक बालाजी मंदिर येथून सुरू होऊन सुभाष रोड, साठे चौक आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे श्री संत भगवान बाबा प्रतिष्ठान येथे उत्साहात पार पडली. मिरवणुकीदरम्यान भाविक भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमात कुर्ला येथील लेझीम पथकाने आकर्षक सादरीकरण करून वातावरण अधिक रंगतदार केले. तसेच विविध वेशभूषेत सहभागी झालेले विद्यार्थी आणि नागरिकांनीही लक्ष वेधून घेतले. विशेषतः ज्ञानसागर गुरुकुलची वानर सेना तसेच राम पंचायतचे राम-लक्ष्मण वेशभूषेतील सहभागी हे शोभायात्रेचे प्रमुख आकर्षण ठरले.संपूर्ण मिरवणूक भक्तिमय वातावरणात आणि उत्साहपूर्ण प्रतिसादात पार पडली.

COMMENTS