Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना जामीन

मुंबई ः मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना वैद्यकीय कारणास्तव दोन महिन्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला. त्याला एक

मनालीत कार दरीत कोसळून 6 जणांचा मृत्यू
मोमीन युसरा फातेमा जफर अहेमद दहावी बोर्ड परीक्षेत 93 टक्के गुणांसह शाळेत प्रथमनगराध्यक्षा प्रेमलताताई पारवे यांच्या हस्ते सत्कार
अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या थकीत व्याज परताव्याचा प्रश्न तातडीने सोडवा – डॉ. ज्योती मेटेमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन प्रश्न सोडवण्याची करणार मागणी

मुंबई ः मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना वैद्यकीय कारणास्तव दोन महिन्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला. त्याला एक लाख रुपयांचा बाँड भरावा लागणार असून ते मुंबईबाहेर जाऊ शकणार नाहीत. गोयल यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सप्टेंबरमध्ये मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली होती. गोयल यांनी वैद्यकीय आणि मानवतावादी कारणे सांगून अंतरिम जामीन मागितला होता. त्यांना आणि त्यांची पत्नी अनिता गोयल या दोघांनाही कर्करोग आहे. 3 मे रोजी झालेल्या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. त्यानंतर न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.

COMMENTS