Homeताज्या बातम्याबीड

आ.संदिप क्षीरसागरांनी घेतला विविध विभागांचा आढावामतदारसंघातील महत्वाचे प्रश्न तातडीने मार्गी लावण्याच्या केल्या संबंधितांना सुचना

बीड विधानसभा मतदारसंघातील विविध महत्वाच्या प्रश्नांच्या अनुषंगाने आ.संदिप क्षीरसागर यांनी वेगवेळ्या शासकीय विभागांची सोमवारी (दि.27) रोजी आढावा ब

डावखरे कुटुंबात राजकीय फूट; प्रबोध डावखरे राष्ट्रवादीत
ओबीसींची दुसर्‍या टप्प्यात स्वतंत्र जनगणनामंत्री भुजबळ : जातीनिहाय जनगणनेचा मार्ग मोकळा
आ. रोहित पवारांची ईडीच्या फेर्‍यातून सुटका



बीड विधानसभा मतदारसंघातील विविध महत्वाच्या प्रश्नांच्या अनुषंगाने आ.संदिप क्षीरसागर यांनी वेगवेळ्या शासकीय विभागांची सोमवारी (दि.27) रोजी आढावा बैठका घेतल्या. यामध्ये संबंधित विभागांशी निगडीत असलेले नागरिक, शेतकरी यांचे प्रश्न तातडीने मार्गी लावण्याच्या सुचना संबंधित अधिकाङयांना केल्या.
सोमवार (दि.27) रोजी शासकीय विश्रामगृह बीड येथे बीड पंचायत समिती, शिरूर कासार पंचायत समिती, जलसंधारण विभाग, जलसंपदा विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण या विभागांचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मतदारसंघातील नागरिकांचे प्रश्न, शेतकङयांचे प्रश्न, विकास कामांचा आढावा या बाबत चर्चा करण्यात आली. यावेळी आ.संदिप क्षीरसागर, माजी आ.सय्यद सलीम यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी आणि सामान्य नागरिक उपस्थित होते.
पुल कम बंधाङयाच्या कामासाठी महामार्ग प्राधिकरण, जलसंपदा, जलसंधारण विभागांची संयुक्त बैठक
बीड शहरातील बार्शी नाका येथे सुरू असलेल्या पुल कम बंधारा कामाच्या अनुषंगाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, जलसंपदा विभाग आणि जलसंधारण विभाग या तीन विभागांची संयुक्त बैठक झाली. पुढिल येत्या काळात पाणी टंचाई होऊ नये यासाठी लवकरात लवकर पुल कम बंधाङयाचे काम पुर्ण होऊन पाणी अडविण्या बाबतच्या नियोजना संदर्भात यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. येत्या पावसाळ्यातच या ठिकाणी पाणी अडवून बीड शहर आणि परिसरातील गावांची पाणी पातळी वाढविण्याच्या अनुषंगाने ही बैठक महत्वपुर्ण ठरली आहे.

COMMENTS