Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दंगली घडवणार्‍यांना अद्दल घडवणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा

अकोल्यानंतर शेवगावमध्ये जोरदार राडा

मुंबई/प्रतिनिधी ः विदर्भातील अकोला जिल्ह्यात आणि अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यामध्ये दोन गटांमध्ये झालेल्या जोरदार राड्यात मोठ्या प्रमाणात त

जरांगे यांनी मुख्यमंत्र्यावर विश्‍वास ठेवावा; देवेंद्र फडणवीस
बंजारा समाजाच्या मागण्यांसाठी लवकरच बैठक घेऊ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
विकासकामांना स्थगिती देण्यास नकार मुंबई उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय 

मुंबई/प्रतिनिधी ः विदर्भातील अकोला जिल्ह्यात आणि अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यामध्ये दोन गटांमध्ये झालेल्या जोरदार राड्यात मोठ्या प्रमाणात तोड-फोड करण्यात आली असून, शेवगाव येथील हल्ल्यात चार पोलिस देखील जखमी झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर बोलतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रात जाणीवपूर्वक दगंली घडवून राज्याला अशांत करण्याचा प्रयत्न काही प्रवृत्तीकडून सुरू असला तरी, या दंगलखोरांना अद्दल घडवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशाराच त्यांनी यावेळी दिला आहे.
दोन्ही ठिकाणी पूर्पणे शांतता आहे. पोलीस अलर्ट मोडवर होते, त्यामुळे कुठेही अनटोल्ड इंसिडन्स होऊ दिला नाही. जेव्हा लक्षात आलं की अशाप्रकारे काही लोक करण्याचं प्रयत्न करताहेत, सगळीकडची पोलीस कुमक त्याठिकाणी पोहोचली आणि आता पूर्ण परिस्थिती नियंत्रणात आहे. महाराष्ट्रात कोणालाही दंगली घडवू देणार नाही. जे दंगली घडवण्याचा प्रयत्न करताहेत त्यांना अद्दल घडवणार. असा इशारा फडणवीस यांनी यावेळी दिला. तसेच, हे 100 टक्के जाणूनबुजून होत आहे. कोणाची तरी फूस आहे. कोणीतरी महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे. पण ते सफल होणार नाही. अशाप्रकारे जे करातेहत त्यांना आम्ही सोडणार नाहीत, असा सज्जड दमच फडणवीसांनी दिला आहे. काही संस्था, काही लोक मागून याला आग लावण्याचा, आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न करताहेत आणि हे सगळं बाहेर आणेन. असही फडणवीस यावेळी म्हणाले.

दंगलीमागे कोणाची तरी फूस – दंगली घडवण्याचे प्रयत्न शंभर टक्के जाणूनबुजून होत आहेत. कोणाची तरी फूस आहे. कोणीतरी जाणीवपूर्वक महाराष्ट्रातली कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे. पण ते सफल होणार नाहीत. आणि अशाप्रकारे जे करत आहेत, त्यांना आम्ही सोडणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. काही लोक आग लावण्याचा, आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न करत आहेत. हे सगळे बाहेर आणणार असल्याचा इशारा उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला आहे.

विधानसभा अध्यक्षांना घेराव घालण्याचे चुकीचे वक्तव्य – उपमुख्यमंत्री फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणांवर बोलतांना म्हणाले की, विधानसभा अध्यक्षांना घेराव करू. आम्ही त्यांना चालू देणार नाही. आम्ही त्यांना फिरू देणार नाही, असे काही जण म्हणत आहेत. मात्र, हे कुठल्या लोकशाहीत बसणारे आहे. अशा दबावातून विधानसभा अध्यक्ष कधीच निर्णय घेत नसतात. तुम्ही खरे असाल, तर तुमचा मुद्दा मांडा. कुठेतरी तुम्हाला माहिती आहे की, तुमची बाजू कमकुवत आहे. म्हणून अशा प्रकारची भाषा वापरणे सुरू आहे, असे म्हणत त्यांनी विरोधकांना उत्तर दिले. देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, विधानसभेचे अध्यक्ष एक निष्णात वकील आहेत. कायदा समजणारे आहेत. वर्षानुवर्ष प्रॅक्टीस केलेले आहेत. ते कुठलेही बेकायदेशीर काम करणार नाहीत. स्पष्टपणे सर्वोच्च न्यायालयाने रिझनेबल टाइम म्हटलेले आहे. रिझनेबल टाइमचा अर्थ देखील स्पष्टपणे अध्यक्षांना समजतो, असा इशाराच त्यांनी यावेळी दिला.

COMMENTS