Homeताज्या बातम्यादेश

संत बंकटस्वामींचे काकडा भजन पांडुरंगाला प्रिय-बाळू महाराज गिरगावकर

समाधिधन संत बंकटस्वामी महाराज यांची वाणी साधनेने पवित्र झालेली होती. पंढरपूर येथे काकडा करत असताना त्यांचे भजन पांडुरंग यांना अत्यंत आवडत असे, अस

पुण्यात धारदार तलवारी जप्त
गोदावरी खरोखर प्रदूषणमुक्त?; मनपाच्या दाव्यांवर एनजीटीतील याचिकेमुळे प्रश्नचिन्ह!
ॲड. शारदाताई लगड यांचा सावित्री-ज्योती गौरव पुरस्काराने सन्मान



समाधिधन संत बंकटस्वामी महाराज यांची वाणी साधनेने पवित्र झालेली होती. पंढरपूर येथे काकडा करत असताना त्यांचे भजन पांडुरंग यांना अत्यंत आवडत असे, असे प्रतिपादन बाळू महाराज गिरगावकर यांनी केले.
संत बंकटस्वामी महाराज यांच्या 82 व्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त नेकनूर येथे दुसर्‍या दिवसाचे कीर्तन पुष्प गुंफताना ते बोलत होते. यावेळी महंत लक्ष्मण महाराज मेंगडे, विष्णुपंत महाराज लोंढे गुरुजी, सत्यवान महाराज लाटे, नाना महाराज कदम, सुरेश महाराज जाधव, श्रीकृष्ण महाराज यादव, अच्युत महाराज घोडके, रणजीत महाराज शिंदे, वसंत महाराज शिंदे यांच्यासह हजारो भाविक उपस्थित होते. यावेळी संत निळोबाराय यांच्या अभंगावर सुंदर चिंतन मांडत महाराजांनी भक्तीचे महत्त्व स्पष्ट केले:
भाविकाची आवडी देवा । करी सेवा निज प्रीतीं ॥1॥
हिंडे तया मागें पुढें । नाशी कोडे सकळही ॥2॥
घरीं दारीं वसे हरी । विश्वंभरी भाव ज्या ॥3॥
निळा म्हणे संदेह नाहीं । भक्तां पाही यावरीं ॥4॥
पुराणातील उदाहरणांद्वारे देवाला भाविकांची आवड कशी असते, हे त्यांनी स्पष्ट केले. वारकरी संप्रदायातील संत बंकटस्वामी महाराज यांची भूमी ही पवित्र असून त्यांच्या दरबारात अन्नदान, ज्ञानदान आणि भजन यांची परंपरा अखंड सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. बंकटस्वामींचा काकडा ऐकण्यासाठी पंढरपूर येथे भाविकांची मोठी गर्दी होत असे. त्यांच्या साधनेतून आलेल्या स्वरामुळे पांडुरंग देखील त्या भजनाच्या चालींना मोहित होत असत, असेही त्यांनी नमूद केले. तसेच संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या परंपरेनंतर संत बंकटस्वामी महाराज यांनी वारकरी संप्रदायातील साधनेची आचारसंहिता दृढ केली. त्यांच्या समाधीवर मस्तक ठेवले की पांडुरंग दर्शनाचा अनुभव येतो, असेही ते म्हणाले. कीर्तनाला संगीताचीही सुरेख साथ लाभली. मृदंग सम्राट भरत महाराज पठाडे, शत्रुघ्न महाराज पठाडे यांनी ताल दिला, तर रवी महाराज पवार, सोपान महाराज आळंदीकर, बाबासाहेब महाराज शिंदे, रोहिदास महाराज शिंदे, सतीश महाराज जाधव यांच्यासह फडावरील टाळकरी, गायक-वादक मंडळी उपस्थित होती. एकूणच, भक्तिमय वातावरणात संपन्न झालेल्या या कीर्तनाने भाविकांना अध्यात्मिक आनंदाची अनुभूती दिली.

COMMENTS