Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आ. संदीप क्षीरसागरांची महसूलमंत्र्यांशी भेट; अनेक प्रलंबित प्रश्न लागणार मार्गी

बीड विधानसभा मतदारसंघातील महसूल विभागाशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्नांच्या अनुषंगाने आमदार संदीप क्षीरसागर यांनी मंगळवारी (दि. 21) महाराष्ट्र र

कै. डॉ. भाऊसाहेब देशमुख विद्यालयाचा दहावीचा निकाल 80.83 टक्के
बीड जिल्ह्यात अनेक वर्षांनंतर पुन्हा ’रॉकेल’ पर्व; 62 रुपये दराने मिळणार रॉकेलतहसीलदार विलास तरंगे यांच्या हस्ते टँकरचे उध्दघाटन
छाया सरोदे यांना मानाचा ‘युवा लोकमित्र जिव्हाळा माउली सन्मान 2026’ जाहीररक्ताची नाती दुरावलेल्या बेघर वृद्ध, अनाथ व वंचितांना मायेची भाकर देणार्‍या ‘माउली’चा बीडमध्ये होणार भव्य गौरव



बीड विधानसभा मतदारसंघातील महसूल विभागाशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्नांच्या अनुषंगाने आमदार संदीप क्षीरसागर यांनी मंगळवारी (दि. 21) महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. या भेटीत विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली असून प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी लावण्याबाबत मंत्री बावनकुळे यांनी सकारात्मक भूमिका दर्शविली.
या बैठकीत बीड जिल्ह्यात महसूल वाढविणे, सुशिक्षित तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, तसेच महसूल विभागातील प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. याशिवाय मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजनेअंतर्गत बीड मतदारसंघातील वाडी-वस्त्यांपर्यंत रस्ते विकासासाठी भरीव निधीची मागणीही करण्यात आली. महसूलमंत्री बावनकुळे यांनी सर्व मागण्यांबाबत सकारात्मकता दर्शवित लवकरच कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले. त्यामुळे बीड मतदारसंघातील अनेक प्रलंबित प्रश्न निकाली लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

COMMENTS