देवळाली प्रवरा : गुहा येथील प्रेरणा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था (स्थापना 2002) ने आर्थिक शिस्तीची परंपरा कायम राखत यंदाही उल्लेखनीय कर्जवस

देवळाली प्रवरा : गुहा येथील प्रेरणा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था (स्थापना 2002) ने आर्थिक शिस्तीची परंपरा कायम राखत यंदाही उल्लेखनीय कर्जवसुली केली आहे. संस्थेची बँक पातळीवर शंभर टक्के, तर सोसायटी पातळीवर 96 टक्के कर्जवसुली पूर्ण झाल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष सुरेश वाबळे पाटील यांनी दिली.30 जून अखेर संस्थेकडे वसुलीस पात्र कर्जाची रक्कम 2 कोटी 15 लाख 27 हजार 885 रुपये होती. त्यापैकी 2 कोटी 6 लाख 88 हजार 510 रुपयांची वसुली करण्यात आली. संस्थेचे एकूण 119 कर्जदार असून त्यांनी वेळेत कर्जफेड करून संस्थेच्या आर्थिक शिस्तीला हातभार लावला आहे. संस्थेचे सचिव दीपक सौदागर यांनी वसुलीचे कामकाज प्रभावीपणे सांभाळले. बँक पातळीवरील शंभर टक्के वसुलीसाठी सहकार्य करणाऱ्या सर्व कर्जदारांचे संस्थेचे उपाध्यक्ष अशोक उऱ्हे, संचालक मंडळ तसेच संस्थेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.

COMMENTS