Homeताज्या बातम्या

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपीला जन्मठेप; बीड जिल्हा व सत्र न्यायालयाचा मोठा निकाल

बीड: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालय, बीड यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच आर

मुंबई लोकलमध्ये थरार! डब्यात पाऊस येण्यावरून झालेल्या वादात २२ वर्षीय तरुणाची चाकू भोसकून हत्या
मुद्रांक नोंदणी प्रकरणातील गैरव्यवहारांची एजी कार्यालयामार्फत होणार राज्यस्तरीय चौकशी; विशेष टास्क फोर्स स्थापन होणार
भगवंत मान व्हिडिओ प्रकरणाला नवे वळण! भाजपकडून मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरण; नराधम भावासह त्याला साथ देणाऱ्या बहिणीला  कारावास Beed Marathi News | Beed Crime: Court Sentences Brother and Sister  to 10 Years Imprisonment for ...

बीड: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालय, बीड यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच आरोपीला १० हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

याबाबत पोलीस ठाणे पेठ, बीड येथे भारतीय न्याय संहिता (बीएनएस) च्या विविध कलमांसह पोक्सो कायद्याच्या कलम ४, ६ व ८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पिंक पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक लांडगे आणि पोलीस हवालदार पांडुरंग शिंदे यांनी केला. आरोपी रियाज जमील शेख (वय ३०, रा. मोहम्मदिया कॉलनी, पेठ, बीड) याला तात्काळ ताब्यात घेऊन सखोल तपासाअंती न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.

विशेष सत्र न्यायालयातील सुनावणीदरम्यान १५ जुलै २०२६ रोजी जिल्हा व सत्र न्यायालय क्रमांक १, बीड यांनी आरोपीला पोक्सो कायद्यान्वये जन्मठेप व १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास सहा महिन्यांचा अतिरिक्त सश्रम कारावास भोगावा लागणार आहे. तसेच बीएनएस कलम ३५१(२) अंतर्गत एक वर्ष सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिन्याच्या अतिरिक्त सश्रम कारावासाची शिक्षाही न्यायालयाने ठोठावली आहे.

सदर प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान फिर्यादी व साक्षीदारांना आवश्यक मार्गदर्शन व समन्वयाचे काम पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख, उपविभागीय पोलीस अधिकारी वेंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निलेश केळे, कोर्ट पैरवी अधिकारी पोलीस हवालदार सुभाष मोठे व सफौ. बाळासाहेब सानप यांनी केले.

COMMENTS