Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

NEET पेपरफुटीतून कोट्यवधींची कमाई; मनीषा मांधरेला १४ दिवसांची सीबीआय कोठडी प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या समितीत होती सहभागी; लातूरचा प्राध्यापकही रडारवर

नवी दिल्ली : वैद्यकीय प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षेच्या (NEET) प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग

लाडकी बहीण योजनेत अपात्र महिलांचेच मानधन बंद; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण
बारामती, राहुरी पोटनिवडणूक बिनविरोध नाहीच; काँगे्रसची बारामतीत माघार, मात्र कोणत्याच उमेदवारांना पाठिंबा नाही
प्रशिक्षणादरम्यान पोलीस मुख्यालयात ‘हँडग्रेनेड’चा स्फोट; चार प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचारी जखमी, प्रकृती स्थिर
पेशाने ब्यूटिशियन, नवरा डेंटिस्ट आणि खात्यात... NEET पेपरफुटी प्रकरणात  पकडलेल्या महिलेची कुंडली वाचून धक्काच - Marathi News | NEET Paper Leak  Beauticians Shocking ...

नवी दिल्ली : वैद्यकीय प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षेच्या (NEET) प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) अटक केलेली आरोपी मनीषा मांधरे हिला न्यायालयाने १४ दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. तिला दिल्लीतील राऊज एव्हेन्यू न्यायालयासमोर रविवारी हजर करण्यात आले होते. तपास यंत्रणेच्या मते, मांधरे ही राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या (NTA) प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या समितीशी संबंधित होती. या पेपरफुटीतून कोट्यवधी रुपयांची कमाई करण्यात आल्याचे समोर येत असून, हा पेपर प्रामुख्याने टेलिग्राम चॅनेलवरून इतरांना पुरवण्यात आला होता.

पुण्यात अध्यापन करणाऱ्या मनीषा मांधरे हिला सीबीआयने चौकशीनंतर अटक केली. तपासानुसार, परीक्षेत विचारले जाणारे काही प्रश्न तिला आधीपासूनच माहीत होते. या माहितीच्या आधारे तिने पुण्यात विशेष मार्गदर्शन वर्ग घेऊन विद्यार्थ्यांना वनस्पतीशास्त्र (Botany) आणि प्राणीशास्त्र (Zoology) विषयातील संभाव्य प्रश्न व उत्तरे दिल्याची शंका व्यक्त केली जात आहे. या प्रकरणात आधी अटक झालेली मनीषा वाघमारे हिच्यामार्फत विद्यार्थ्यांना या वर्गांमध्ये प्रवेश दिला जात असल्याचे तपासात उघड झाले आहे.

केंद्रीय तपास यंत्रणेने आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे आणि अहिल्यानगर येथून नऊ जणांना अटक केली आहे. सीबीआयच्या माहितीनुसार, मनीषा मांधरे आणि मनीषा वाघमारे यांनी प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्याच्या मोबदल्यात विद्यार्थी व पालकांकडून मोठ्या प्रमाणावर पैसे घेतले. या तपासात पी. व्ही. कुलकर्णी याचे नावही समोर आले आहे. तो लातूरमधील रसायनशास्त्राचा (Chemistry) प्राध्यापक असून, अनेक वर्षांपासून प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या मंडळाशी जोडलेला असल्याचा दावा तपास यंत्रणेने केला आहे. एप्रिल महिन्याच्या अखेरीस त्याने काही विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन करत संभाव्य प्रश्न-उत्तरे सांगितल्याची माहिती समोर आली आहे.

राष्ट्रीय परीक्षा संस्थेमध्ये (NTA) नव्या नियुक्त्या केंद्र सरकारने राष्ट्रीय परीक्षा संस्थेमध्ये (NTA) काही महत्त्वाचे प्रशासकीय बदल केले आहेत. महसूल सेवेत कार्यरत आकाश जैन आणि आदित्य भोजगढिया यांची सहसंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच अनुजा बापट आणि रुचिता विज यांची सहसचिव पदावर नियुक्ती करण्यात आली असून, त्यांचा कार्यकाळ पुढील आदेशापर्यंत किंवा पाच वर्षांसाठी राहणार आहे. नीट (NEET) परीक्षा ३ मे रोजी देशातील ५५१ शहरांमध्ये तसेच परदेशातील १४ केंद्रांवर घेण्यात आली होती. सुमारे २३ लाख विद्यार्थ्यांनी या परीक्षेला हजेरी लावली होती.

राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) बरखास्त करण्याची मागणी या संपूर्ण प्रकरणानंतर राष्ट्रीय परीक्षा संस्था बरखास्त करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली आहे. ‘युनायटेड डॉक्टर्स फ्रंट’ या संघटनेने दाखल केलेल्या याचिकेत नवीन स्वतंत्र राष्ट्रीय परीक्षा मंडळ स्थापन करण्याची मागणी केली आहे. तसेच राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांवर न्यायालयीन देखरेख असलेली स्वतंत्र समिती स्थापन करून प्रश्नपत्रिका फुटीला आळा घालण्याची मागणीही करण्यात आली आहे.

COMMENTS