Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मेहत्रे यांना ७ मेपर्यंत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश; जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश; कर्जत नगरपंचायतीत सत्तासंघर्ष तीव्र

कर्जत : कर्जत नगरपंचायतीतील राजकारण सध्या चांगलेच तापले असून गटनेते व उपनगराध्यक्ष संतोष मेहत्रे यांना ७ मे रोजी नगरसेवकांची बैठक बोलावून बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत या प्रकरणात कोणत्या नाट्यमय घडामोडी घडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गटनेते संतोष मेहत्रे नगरसेवकांना विश्वासात न घेता कामकाज करत असल्याचा आरोप करत उपनेते सतीश पाटील यांनी बहुमताचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केला आहे. मात्र, उपनेत्यांना बैठक बोलावण्याचा अधिकार नसून तो अधिकार केवळ गटनेत्यालाच असल्याचा दावा करत मेहत्रे यांनीही या प्रकरणात अपील दाखल केले आहे. या पार्श्वभूमीवर आज (५ मे) जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी झाली. यावेळी संतोष मेहत्रे यांच्या वतीने वकिलांनी युक्तिवाद करत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या १५ नगरसेवकांच्या गटनेतेपदी त्यांची सर्वानुमते निवड झाल्याचे सांगितले. तसेच बैठक बोलावण्याचा अधिकार केवळ गटनेत्यालाच असल्याचे नमूद करत उपनेत्यांनी बोलावलेली बैठक ग्राह्य धरू नये, अशी मागणी करण्यात आली. यासाठी आवश्यक पुरावेही सादर करण्यात आले. सुनावणीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी संतोष मेहत्रे यांनी संबंधित १५ नगरसेवकांची बैठक घेऊन बहुमत सिद्ध करावे आणि त्याबाबतचे पुरावे ७ मेपूर्वी सादर करावेत, असे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता मेहत्रे बैठक बोलावून आपले बहुमत टिकवून ठेवतात का, याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, काँग्रेसराष्ट्रवादी काँग्रेसच्या १५ सदस्यांच्या गटातील नऊ नगरसेवकांनी यापूर्वीच गटनेते बदलण्याची मागणी केली आहे. त्यात माजी नगराध्यक्ष नामदेवराव राऊत व माजी नगराध्यक्ष  उषा राऊत यांनीही जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहून मेहत्रे यांच्या विरोधात भूमिका घेत गटनेता बदलण्यास पाठिंबा दर्शवणारे पत्र सादर केले. त्यामुळे या राजकीय घडामोडींना आणखी वेग आला आहे.

 स्वामी समर्थ केंद्रास निधी मिळवून देण्यात आ. काळेंचे योगदान : आढाव
राहुरी पोटनिवडणुकीत अक्षय कर्डिलेंचा 1 लाखांपेक्षा अधिक मतांनी विजय
कर्जतच्या प्रश्नांसाठी उपमुख्यमंत्री शिंदे यांना निवेदन 
Karjat Nagarpanchayat in Karjat Ahmednagar,Ahmednagar - Best Government  Organisations near me in Ahmednagar - Justdial

कर्जत : कर्जत नगरपंचायतीतील राजकारण सध्या चांगलेच तापले असून गटनेते व उपनगराध्यक्ष संतोष मेहत्रे यांना ७ मे रोजी नगरसेवकांची बैठक बोलावून बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत या प्रकरणात कोणत्या नाट्यमय घडामोडी घडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गटनेते संतोष मेहत्रे नगरसेवकांना विश्वासात न घेता कामकाज करत असल्याचा आरोप करत उपनेते सतीश पाटील यांनी बहुमताचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केला आहे. मात्र, उपनेत्यांना बैठक बोलावण्याचा अधिकार नसून तो अधिकार केवळ गटनेत्यालाच असल्याचा दावा करत मेहत्रे यांनीही या प्रकरणात अपील दाखल केले आहे.

या पार्श्वभूमीवर आज (५ मे) जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी झाली. यावेळी संतोष मेहत्रे यांच्या वतीने वकिलांनी युक्तिवाद करत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या १५ नगरसेवकांच्या गटनेतेपदी त्यांची सर्वानुमते निवड झाल्याचे सांगितले. तसेच बैठक बोलावण्याचा अधिकार केवळ गटनेत्यालाच असल्याचे नमूद करत उपनेत्यांनी बोलावलेली बैठक ग्राह्य धरू नये, अशी मागणी करण्यात आली. यासाठी आवश्यक पुरावेही सादर करण्यात आले.

सुनावणीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी संतोष मेहत्रे यांनी संबंधित १५ नगरसेवकांची बैठक घेऊन बहुमत सिद्ध करावे आणि त्याबाबतचे पुरावे ७ मेपूर्वी सादर करावेत, असे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता मेहत्रे बैठक बोलावून आपले बहुमत टिकवून ठेवतात का, याकडे लक्ष लागले आहे.

दरम्यान, काँग्रेसराष्ट्रवादी काँग्रेसच्या १५ सदस्यांच्या गटातील नऊ नगरसेवकांनी यापूर्वीच गटनेते बदलण्याची मागणी केली आहे. त्यात माजी नगराध्यक्ष नामदेवराव राऊत व माजी नगराध्यक्ष  उषा राऊत यांनीही जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहून मेहत्रे यांच्या विरोधात भूमिका घेत गटनेता बदलण्यास पाठिंबा दर्शवणारे पत्र सादर केले. त्यामुळे या राजकीय घडामोडींना आणखी वेग आला आहे.

COMMENTS