Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सीडीआरमधील आरोप माहितीच्या आधारेच : दमानियाअजितदादांचा अपघाताच्या दिवशी समता संस्थेकडून खरातला आलेल्या मेसेजवर प्रश्‍नचिन्ह ?

मुंबई : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अशोक खरात यांच्या कॉल तपशील (सीडीआर) प्रकरणावरून सुरू झालेल्या वादाला पत्रकार परिषदेत सविस्तर उत

राहात्यात समता पतसंस्थेवर ईडीची धाडदिवसभर चौकशी; अशोक खरात प्रकरणी कोट्यवधींच्या व्यवहारांचा तपास
अशोक खरात प्रकरणाला आर्थिक गैरव्यवहारांचे नवे वळण; शेकडो खात्यांतून कोट्यवधींची उलाढाल संशयाच्या भोवर्‍यात
लॉकडाऊनच्या अफवा पसरवू नका !केंद्र आणि राज्य सरकारचे आवाहन; परिस्थिती नियंत्रणात

मुंबई : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अशोक खरात यांच्या कॉल तपशील (सीडीआर) प्रकरणावरून सुरू झालेल्या वादाला पत्रकार परिषदेत सविस्तर उत्तर दिले. विरोधकांकडून होत असलेल्या आरोपांना त्यांनी ठामपणे नाकारत, आपण कोणत्याही राजकीय हेतूने नव्हे तर उपलब्ध माहितीच्या आधारेच हे मुद्दे मांडले असल्याचे स्पष्ट केलेदमानिया यांनी सांगितले की, अशोक खरात यांच्यासोबत विविध व्यक्तींचे असलेले संबंध समजून घेण्यासाठी त्यांनी उपलब्ध क्रमांकांचा शोध घेतला. या प्रक्रियेत जे तपशील मिळाले, तेच सार्वजनिक केले असून त्यात कोणताही पक्षपात केलेला नाही, असे त्यांनी नमूद केले. सुरुवातीपासूनच आपल्यावर आरोप होतील याची कल्पना असल्याने संबंधित माहिती संकलित केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सुषमा अंधारे यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना दमानिया यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. आम्ही मुद्द्यांवर लढतो, निरर्थक राजकारण करत नाही, असे सांगत त्यांनी विविध नेत्यांची नावे घेत, त्यांच्या कॉल नोंदींमध्ये कोणताही संबंध आढळला नसल्याचे सांगितले. निवडक माहिती सादर केल्याचा आरोप फेटाळत, जे तपशील उपलब्ध झाले तेच मांडले, अशी भूमिका त्यांनी घेतली. पुढे बोलताना त्यांनी असा सवाल उपस्थित केला की, काही व्यक्तींविषयी चौकशीची मागणी का केली जात नाही? विशिष्ट व्यक्तींवरच लक्ष केंद्रित केले जात असल्याचा आरोप करत, विरोधकांच्या भूमिकेवर त्यांनी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले. या प्रकरणात अनेक राजकीय नेत्यांचे कॉल तपशील समोर आल्याचा दावा करत दमानिया म्हणाल्या की, अशा प्रकरणांत सर्वच राजकीय घटकांकडून संशयास्पद व्यक्तींना संरक्षण दिले जाते का, याची चौकशी होणे आवश्यक आहे. संबंधितांनी अशोक खरात यांच्याशी संपर्क का ठेवला, याचे उत्तर जनतेसमोर यायला हवे, अशी मागणी त्यांनी केली. याशिवाय, ‘समता’ नावाच्या पतसंस्थेशी संबंधित काही संदेशांच्या नोंदीही त्यांनी मांडल्या. विशिष्ट कालावधीत अचानक संदेशांची संख्या वाढल्याचा उल्लेख करत, या बाबींची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सीडीआर काढणे गुन्हाच, तीन वर्षांची शिक्षा
सामाजिक कार्यकत्या अंजली दमानिया यांनी जाहीर केलेल्या सीडीआर रिपोर्टवरून प्रश्‍न उपस्थित होत असतांना, अशा पद्धतीने एखाद्या व्यक्तीने दुसर्‍याचा अनधिकृतपणे सीडीआर काढणे हा गुन्हाच असल्याचं मत निवृत्त पोलीस अधिकारी खुशालचंद बाहेती यांनी स्पष्ट केले. एखाद्याच्या फोनचे सीडीआर अर्थात कॉल डिटेल्स रेकॉर्ड मिळवणे हा गुन्हा आहे, तो त्याच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रकार आहे असे स्पष्ट मत बाहेती यांनी मांडले आहे. भारतीय तार कायदा कलम 25 नुसार तो गुन्हा असून त्याबद्दल संबंधिताला तीन वर्षांची शिक्षा होऊ शकते असे त्यांनी सांगितले.

COMMENTS