Homeताज्या बातम्या

पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राहाता जिल्हा परिषद शाळेत शालेय साहित्याचे वाटप

राहाता : राज्याचे जलसंपदा तथा पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या ६७ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, राहाता (मुल

एमबीबीएस उत्तीर्ण विद्यार्थिनींचा श्रीगोंद्यात ‘राजमाता’ पतसंस्थेकडून गौरव; शिवानी जठार आणि अदिती शिंदे यांचा सन्मान
रावसाहेब शिंदे जीवनगौरव पुरस्कार माझ्यासाठी सर्वश्रेष्ठ; कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के यांचे प्रतिपादन
आंध्र प्रदेशातील भाजप आमदार ईश्वरा राव नंदुकुडिती यांनी घेतले शनीदेवांचे दर्शन; आमदार विठ्ठलराव लंघे यांच्याकडून सत्कार

राहाता : राज्याचे जलसंपदा तथा पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या ६७ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, राहाता (मुले) येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच चालू शैक्षणिक वर्षात नव्याने प्रवेश घेतलेल्या चिमुरड्यांचे पुष्पगुच्छ देऊन उत्साहात स्वागत करण्यात आले.

या सामाजिक उपक्रमात नगरपरिषद सदस्या अर्चना निकाळे व निकाळे परिवाराच्या वतीने विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक साहित्याचे मोफत वितरण करण्यात आले. यावेळी राहाता तालुक्याचे गटविकास अधिकारी (BDO) विवेक गुंड, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र निकाळे, अर्चना निकाळे तसेच माजी नगरपरिषद सदस्य भीमराज निकाळे यांच्या प्रमुख हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, शासकीय योजनेतील मोफत पाठ्यपुस्तके आणि गणवेशांचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी बोलताना राजेंद्र निकाळे यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत मोलाचे मार्गदर्शन केले. या कौतुकास्पद कार्यक्रमास रावसाहेब निकाळे, आबा निकाळे, विलास पाळंदे, विरेश सोनवणे, सुधाकर निकाळे, अरविंद पाळंदे, राहुल बनसोडे, हर्षल तोरणे, कृष्णा गाडेकर, अंकुश निकाळे, दीपक गाडेकर, शुभम गाडेकर, तन्वीर तांबोळी यांच्यासह शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन दर्शने यांनी केले, तर उपस्थितांचे आभार राहुल पुरी यांनी मानले.

COMMENTS