Homeताज्या बातम्या

महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू थेट शेतकऱ्याच्या शेतात! राऊतवाडीतील ‘कोकण बहाडोली’ जांभूळ बाग ठरतेय अभ्यासाचा विषय

देवळाली प्रवरा : महात्मा फुले कृषी विद्यापीठातील अत्याधुनिक संशोधन आणि तंत्रज्ञान थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने विद्याप

धानोरेतील गौण खनिजावर ‘डल्ला’? ‘जलजीवन’च्या तळ्यातील दगड-डबराचा गैरव्यवहार झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप
सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या    
गुहा येथे उद्या गावधोंडा सोहळ्याची सांगता; महाविष्णू यागाची होणार पूर्णाहूती

देवळाली प्रवरा : महात्मा फुले कृषी विद्यापीठातील अत्याधुनिक संशोधन आणि तंत्रज्ञान थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी रविवारी राऊतवाडी (पिंपळगाव फुंगी) येथे भेट दिली. येथील प्रगतिशील शेतकरी सतीश राऊत यांच्या ‘कोकण बहाडोली’ जांभूळ बागेला भेट देत त्यांनी या अनोख्या प्रयोगाची प्रत्यक्ष पाहणी केली. एका ग्रामीण भागातील शेतकऱ्याच्या बागेला कुलगुरूंनी स्वतः भेट दिल्याने परिसरातील शेतकरी वर्गात कमालीचा उत्साह दिसून आला.

शेतकरी सतीश राऊत यांनी आपल्या जांभूळ बागेतील फळांची गुणवत्ता, एकूण उत्पादन क्षमता आणि जांभळापासून तयार करण्यात आलेल्या विविध मूल्यवर्धित (Value-added) उत्पादनांची सविस्तर माहिती कुलगुरूंना दिली. तर डॉ. गीता राऊत यांनी बागेचे तांत्रिक व्यवस्थापन, लागवड पद्धती आणि उत्पादन प्रक्रियेबाबत सादरीकरण केले.

या पाहणी दरम्यान कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी बागेतील उत्कृष्ट फळधारणा, झाडांची योग्य वाढ आणि आधुनिक व्यवस्थापनाचे कौतुक केले. जांभळासारख्या पारंपरिक फळपिकातून मूल्यवर्धित उत्पादने तयार करून ग्रामीण भागात शाश्वत रोजगार व अतिरिक्त उत्पन्नाची मोठी संधी निर्माण करता येते, असे मत त्यांनी व्यक्त केले. विशेष म्हणजे कुलगुरूंनी शेतातील प्रत्यक्ष काम करणाऱ्या मजुरांशीही संवाद साधला. या प्रसंगी अन्न प्रक्रिया विभागाचे प्रमुख डॉ. विक्रम कड, डॉ. गीता राऊत, सतीश राऊत, नारायणतात्या जाधव, जगू पा. वर्पे, संभाजी गाडे यांच्यासह विद्यापीठाचे अधिकारी व स्थानिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS