Homeताज्या बातम्या

आंध्र प्रदेशातील भाजप आमदार ईश्वरा राव नंदुकुडिती यांनी घेतले शनीदेवांचे दर्शन; आमदार विठ्ठलराव लंघे यांच्याकडून सत्कार

सोनई : आंध्र प्रदेशातील भाजपचे एचेर्ला मतदारसंघाचे आमदार ईश्वरा राव नंदुकुडिती यांनी शनिवारी (दि. १३ जून २०२६) सायंकाळच्या आरतीवेळी श्री क्षेत्र

एमबीबीएस उत्तीर्ण विद्यार्थिनींचा श्रीगोंद्यात ‘राजमाता’ पतसंस्थेकडून गौरव; शिवानी जठार आणि अदिती शिंदे यांचा सन्मान
विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारल्यास बस अडवावी लागेल; आमदार आशुतोष काळे यांचा एसटी प्रशासनाला सूचक इशारा
मृत्यूशी झुंजणाऱ्या १५ वर्षे जुन्या वटवृक्षाचे श्रीगोंद्यात यशस्वी पुनर्रोपण; वृक्षप्रेमींचा स्तुत्य उपक्रम

सोनई : आंध्र प्रदेशातील भाजपचे एचेर्ला मतदारसंघाचे आमदार ईश्वरा राव नंदुकुडिती यांनी शनिवारी (दि. १३ जून २०२६) सायंकाळच्या आरतीवेळी श्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथे शनीदेवांचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी मुख्य चौथऱ्यावर उपस्थित राहून महाआरतीला हजेरी लावली. याप्रसंगी नेवासा तालुक्याच्या वतीने आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी पुष्पगुच्छ आणि शाल देऊन त्यांचा भावपूर्ण सत्कार व स्वागत केले.

या सोहळ्याप्रसंगी ओडिशा येथील शंकर साहू, शनिशिंगणापूरचे सरपंच बाळासाहेब बानकर, माजी सभापती किशोर जोजार, उद्योजक संदीप बानकर, सतीश कर्डिले, शिवसेनेचे नेते पंडितराव सोनवणे, आमदारांचे स्वीय सहाय्यक विजय पवार आणि देवस्थानचे जनसंपर्क अधिकारी अनिल दरंदले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

सत्कारादरम्यान आमदार ईश्वरा राव यांनी आमदार विठ्ठलराव लंघे यांना आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिर आणि ओडिशामधील जगन्नाथ पुरी येथे दर्शनासाठी येण्याचे आग्रहाचे निमंत्रण दिले. या दोन्ही नेत्यांमध्ये दोन्ही राज्यांतील धार्मिक पर्यटन, भाविकांना मिळणाऱ्या सुविधा आणि परस्पर सहकार्याबाबत विविध विषयांवर अनौपचारिक चर्चा झाली. आमदार ईश्वरा राव नंदुकुडिती हे २०२४ पासून आंध्र प्रदेशातील एचेर्ला विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांनी शनीचरणी लीन होऊन देशातील व राज्यातील नागरिकांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.

COMMENTS