Homeताज्या बातम्या

रावसाहेब शिंदे जीवनगौरव पुरस्कार माझ्यासाठी सर्वश्रेष्ठ; कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के यांचे प्रतिपादन

श्रीरामपूर : “श्रीरामपूरमध्ये वास्तव्यास असताना स्व. रावसाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाचा मोलाचा लाभ मला मिळाला. श्रीरामपूरकरांच्या स्नेहातून आणि

एमबीबीएस उत्तीर्ण विद्यार्थिनींचा श्रीगोंद्यात ‘राजमाता’ पतसंस्थेकडून गौरव; शिवानी जठार आणि अदिती शिंदे यांचा सन्मान
आंध्र प्रदेशातील भाजप आमदार ईश्वरा राव नंदुकुडिती यांनी घेतले शनीदेवांचे दर्शन; आमदार विठ्ठलराव लंघे यांच्याकडून सत्कार
अगस्ती आश्रमामुळे अकोलेच्या भूमीला ऐतिहासिक महत्त्व; गोविंदगिरी महाराजांच्या उपस्थितीत अकोलेत महिनाभर अखंड कीर्तन महोत्सव

श्रीरामपूर : “श्रीरामपूरमध्ये वास्तव्यास असताना स्व. रावसाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाचा मोलाचा लाभ मला मिळाला. श्रीरामपूरकरांच्या स्नेहातून आणि संस्कारातूनच माझे आयुष्य घडले आहे. त्यामुळे महादेव मळा या पवित्र स्थळी रावसाहेब शिंदे यांच्या नावाने प्रदान करण्यात आलेला हा राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार माझ्यासाठी सर्वश्रेष्ठ पुरस्कार आहे,” असे भावूक गौरवोद्गार कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के यांनी काढले.

श्रीरामपूर येथील महादेव मळा येथे विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानच्या वतीने नुकताच राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष भगीरथ शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू पाटील होते. या सोहळ्यात कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के यांना ‘स्व. रावसाहेब शिंदे राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार-२०२६’ प्रदान करून गौरविण्यात आले.

तसेच, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ माजी प्राचार्य डॉ. एकनाथराव ढोणे यांना ‘ज्ञानतपस्वी डॉ. रत्नाकर मंचरकर राज्यस्तरीय शिक्षणरत्न साहित्य पुरस्कार-२०२६’ देऊन सन्मानित करण्यात आले. याच कार्यक्रमात कवयित्री डॉ. संगीता फासाटे (कटारे) यांनी विद्यावाचस्पती (पीएच.डी.) पदवी संपादन केल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

या सोहळ्यास माजी प्राचार्य टी. ई. शेळके, डॉ. राजीव शिंदे, डॉ. बाबुराव उपाध्ये आणि विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे संस्थापक सचिव सुखदेव सुकळे यांच्यासह शिक्षण, साहित्य व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुखदेव सुकळे यांनी केले, सूत्रसंचालन डॉ. संगीता फासाटे यांनी केले, तर आभार डॉ. शरद दुधाट यांनी मानले.

COMMENTS