धर्म काय कामाचा ?

Homeताज्या बातम्यासंपादकीय

धर्म काय कामाचा ?

भारतीय समाज व्यवस्थेमध्ये स्त्री-पुरुष विषमतेचे विदारक वास्तव आहे. त्यामुळे स्त्री-पुरुषांमध्ये भांडणतंट्यासह एक दुसऱ्यात हिंसाचार घडतो. याचे प्रमाण

मराठीचा ‘अभिजात’ दर्जा कुठे अडकला ?
सीमाप्रश्‍नाचा लढा !
राजीनामासत्र आणि सरकारचा दबाव

भारतीय समाज व्यवस्थेमध्ये स्त्री-पुरुष विषमतेचे विदारक वास्तव आहे. त्यामुळे स्त्री-पुरुषांमध्ये भांडणतंट्यासह एक दुसऱ्यात हिंसाचार घडतो. याचे प्रमाण वाढत आहे. हे खरे आहे की, या प्रक्रियेत पुरुषांच्या तुलनेत स्री अधिक भरकटली घातली जाते. कारण, भारत पुरुष प्रधान, पितृसत्ताक देश आहे, वगैरे. त्यामुळे भारतात स्त्रीमुक्तीच्या अनेक चळवळी उदयाला आल्या आणि संपल्या.भारतीय समाजव्यवस्थेत धार्मिक गुलामीला नाकारत अनेक महापुरुषांनी अमूलाग्र सामाजिक परिवर्तन घडविण्याचा इतिहास आहे. भारतातील सर्व तर्‍हेच्या हिंसाचाराला जात- धर्म- वर्णाचे संदर्भात आहेत हे सत्य. ब्राह्मणी संस्कृतीच्या श्रेष्ठत्वाचा अहंकार स्त्रियांच्या डोक्यात ठासून भरलेला आहे. मनुस्मृतीने ‘ स्रीला स्वातंत्र्याचा अधिकार नाही ‘ असे सांगितले. तर भारतीय संविधानात स्री सह धर्मपीडित सर्व प्रवर्गाच्या लोकांना अनुच्छेद १२ ते ३१ मध्ये समता, स्वातंत्र्य, शोषणाविरुद्ध हक्क, धर्मस्वातंत्र्याचा हक्क, सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क घटनेने दिले. आणि धर्माच्या गुलामीतून मुक्त केले. तरीदेखील श्रद्धा, अंधश्रद्धा, वाईट रूढी परंपरा, धार्मिक गुलामी, हे सर्व  स्री सोडायला तयार आहे का? किंबहुना: अशिक्षित स्त्रिया सोडल्या तरी आजच्या शिक्षित स्त्रिया विज्ञानवादी  आहेत की, धर्मवादी? मनुस्मृतिची भूमिका स्रीच्या दृष्टीने क्रूरपणाची असली तरी, स्रीच्या डोक्यात मनुस्मृतीच्या नियमांचे हितसंबंध आणि त्या नियमाचे पालन पोषण जतन आहे. म्हणजे, ज्या धर्माने स्त्रियांवर अन्याय अत्याचाराचे नियम केले, लादले आणि स्त्रीला गुलाम केले ती स्री संविधानाची समर्थक आहे की धर्माची? मग स्री धर्माची समर्थक असेल तर तिच्या घरात विषमता नांदणार, हे अंतिम सत्य. मात्र ज्या स्त्रिया संविधानाच्या समर्थक आहेत संविधानाच्या नियमाप्रमाणे जीवन मार्गक्रमण करत आहेत, त्यांच्या कुटुंबात समता, प्रेमभाव, स्वातंत्र्य नांदते.
सध्या जगावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.त्यातच कोरोना सारख्या महामारीत भारतीय समाज रसातळाला जात आहे. भारतात बेरोजगारी, आजारी आरोग्यव्यवस्था, नापास झालेली शिक्षणव्यवस्था, वाढते अन्याय-अत्याचार या समस्येमुळे संपूर्ण देशाची वाट लागली आहे. याला जबाबदार इथली धार्मिक राजकीय व्यवस्था आहे.त्यात महिलांवरील अन्याय अत्याचार आणि वाढत्या कौटुंबिक हिंसाचाराचे प्रमाणही गतिमान. कोरोनामुळे ‘घरात बसा’ या धोरणकर्त्याच्या नियमांमुळे भारतातील कौटुंबिक हिंसाचारात वाढ झाल्याचा दावा तज्ज्ञांनी केला आहे. हे खरे असेलही.पण कौटुंबिक हिंसाचार हा प्रामुख्याने जाती, धर्माच्या अमानवीय नियम रूढी- परंपरा, नातेसंबंध या कारणाने घडतात. कौटुंबिक हिंसाचाराला धर्म कसा जबाबदार आहे हे पाहणे जिकिरीचे. सर्व हिंदू धर्मग्रंथात स्री- पुरुष विषमता सांगितले असून पुरूष हा स्रीपेक्षा श्रेष्ठ असल्याचे सांगितले आहे. एवढेच नव्हे तर स्त्रीचा अवमानही करण्यात आला आहे. गीतेतील अध्याय क्रमांक ६१३ मध्ये म्हटले आहे की, ‘ स्री पाप योनी ‘ आहे. असे सांगून गीतेत स्त्रीचा अवमान करण्यात आला आहे. नास्ति स्रिना क्रिया मंत्रोरिती धर्मो व्यवस्थित: |
निरिंद्रिया हमंत्रायास स्री यो नृतमिती स्तिती ||
( मनुस्मृती, अध्याय ९ वा. श्लोक १८) असे नमूद करून स्त्रियांच्या शिक्षणा विषयी मनूचा दृष्टिकोण संकुचित व नकारात्मक होता हे लक्षात येते. स्त्रियांवर वैदिक मंत्रांनी संस्कार केले जाऊ नये असे धर्मात सांगितले आहे. मंत्र रहित असल्यामुळे श्रुती, स्मृति इत्यादीचा अधिकार त्यांना नाही. कारण निरिंद्रिय ज्ञान ग्रहण करणाऱ्या इंद्रियांनी स्रिया रहित असतात. त्यामुळे त्या असत्यसम असतात, असे मनु म्हणतो. पत्नी अप्रिय बोलली तर पतीने लगेच दुसरे लग्न करावे, तसे मनुस्मृती ( अध्याय ९ श्लोक ८१ ) सांगते. पती चारित्रहिन असला तरी स्रीने त्याची देवाप्रमाणे पूजा करावी , असेही मनुस्मृती ( मनुस्मृती, अध्याय ५ श्लोक १५४ ) सांगते.  स्री म्हणजे मूर्तिमंत कुटिलता, द्रोह आणि दुराचरण ( मनुस्मृती, अध्याय ३ श्लोक ४८ ) हे मनूचे विधान स्री निंदा करणारे आहे. पुरुषांना मोहीत करणे हा स्त्रियांचा मूळ स्वभाव आहे. आणि म्हणून बुद्धिमान माणसे स्री यांच्या सहवासात सुरक्षित राहू शकत नाही. ( मनुस्मृती, अध्याय २ श्लोक २१३) पित्याने बालपणात स्रीचे रक्षण करावे. तारुण्यात पतीने तर वृद्धापकाळात मुलांनी रक्षण करावे. स्री ही केव्हाही स्वतंत्र राहण्यास योग्य नाही. ( मनुस्मृती, अध्याय ९ श्लोक ३ ) असे विविध नियम करून मनुने स्रियाना गुलाम ठेवले. विषमतेची समर्थक असलेले मनुस्मृती आणि  शुद्रांसह स्रिला गुलाम ठेवणारी मनुस्मृती घटनाकारांनी जाळून टाकली. आणि स्रीला गुलामीतून मुक्त केले. मात्र स्त्रिया आजही धर्माच्या कक्षेतून बाहेर आलेल्या नाहीत. ज्या धर्मात स्रीला समतेची वागणूक नाही तो धर्म काय कामाचा?

COMMENTS