Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विद्यार्थ्यांनी अभ्यासाद्वारे पालकांचे स्वप्न पूर्ण करावे : आव्हाड

पाथर्डी : विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांची आवड निर्माण होऊन ते चांगल्या प्रकारे यश संपादन करत आहेत. विद्यार्थ्यांनी दरवर्षी अभ्यासात सातत्य

‘भीमशक्ती’ संघटनेकडून विद्यार्थ्यांना महापुरुषांची पुस्तके वाटप
पार्थ समर कॅम्पमुळे बालकांना नवी दिशा : डॉ. संदीप पवार
शरद पवारांच्या योगदानामुळे ‘रयत’ची उंची वाढली : शिंदे  

पाथर्डी : विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांची आवड निर्माण होऊन ते चांगल्या प्रकारे यश संपादन करत आहेत. विद्यार्थ्यांनी दरवर्षी अभ्यासात सातत्य ठेवावे व आपले स्वतःचे व आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करावे द्यावे असे प्रतिपादन पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व नगराध्यक्ष अभय आव्हाड यांनी केले.
 पार्थ विद्या प्रसारक मंडळ संचलित श्री विवेकानंद प्राथमिक विद्यामंदिर पाथर्डी या शाळेतील राज्यस्तरीय मंथन स्पर्धा परीक्षेत ५३ विद्यार्थ्यांनी राज्य,जिल्हा व तालुका गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केले. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते नुकताच संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अभय आव्हाड होते.
यावेळी पुढे बोलताना अभय आव्हाड म्हणाले,की शालेय स्तरावर विविध स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन केल्यामुळे विद्यार्थ्यांची यूपीएससी व एमपीएससी या स्पर्धा परीक्षांची पूर्वतयारी होते.विद्यार्थ्यांच्या या यशामध्ये मार्गदर्शक शिक्षक व पालकांचे महत्त्वाचे स्थान आहे.यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचे व पालकांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.  
शाळेतील इयत्ता पहिलीतील शिवदीप ठोंबरे व इयत्ता दुसरीतील अवनी डांगे, तनिष्का सानप, शिया  टेकाळे, हंपे अमित, मनियार परवेज व इयत्ता तिसरीतील आतार रईस या आठ विद्यार्थ्यांची राज्यगुणवत्ता यादीत निवड झाली तसेच १७ विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत तर २८ विद्यार्थी तालुका गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केले.  
विद्यार्थी गौरव कार्यक्रम प्रसंगी पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड, माध्य. विभाग मुख्याध्यापक शरद मेढे, समन्वयक ज्ञानेश्वर गायके, प्राथ. विभाग मुख्याध्यापिका अनुजा कुलकर्णी व पालक उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञानेश्वर गायके यांनी केले तर आभार जयश्री एकशिंगे यांनी मानले. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना  अनुजा कुलकर्णी,जयश्री एकशिंगे, मनिषा गायके, आशा बांदल,राधिका सरोदे, ज्योती हंपे ,किर्ती दगडखैर, विद्या घोडके यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

COMMENTS