Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माण तालुक्यातील सोन्या-छब्या बैल जोडीचा लंम्पीमुळे मृत्यू

दहिवडी / प्रतिनिधी : कोरोना महामारीमध्ये अनेक कुटुंब उध्दवस्त होताना सर्वांनी पहिली. मात्र, आता लम्पी आजाराने तसाच धुमाकूळ घातला आहे. माण तालुक

‘काळू-बाळू’सह 6 मातब्बरांचे तमाशाचे फड बंद
पाटणच्या कातकरी वस्तीतील नागरिकांचे लसीकरण
लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपिस 10 वर्षाच्या सक्तमजुरीची शिक्षा

दहिवडी / प्रतिनिधी : कोरोना महामारीमध्ये अनेक कुटुंब उध्दवस्त होताना सर्वांनी पहिली. मात्र, आता लम्पी आजाराने तसाच धुमाकूळ घातला आहे. माण तालुक्यातील पुकळेवाडी येथे लंम्पी आजाराने दोन बैलांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने शेतकरी खचू लागले आहेत.
माण तालुक्यातील अनेक गावात लंम्पी आजाराने धुमाकूळ घातला आहे. मात्र, सरकार व पशुसंवर्धन विभाग तितकासा गंभीर नसल्याचे चित्र आहे. अनेक शेतकर्‍यांना त्याचा फटका बसला आहे. पुकळेवाडी येथे स्वर्गीय वस्ताद पुकळे यांनी पोटच्या मुलाप्रमाणे सभाळ केलेली व वडिलांची आठवण म्हणून त्यांच्या पाठीमागे त्यांची मुले उत्तम व प्रकाश यांनी या सोन्या व छब्या या बैलजोडीचा सांभाळ केला होता. दोन सख्या भावासारखी ही बैलजोडी पुकळे यांच्या दावणीला होती. घरातील लहान मुलालाही जोडी ओळखत होती.
एकजण दावणीला नसेल तर दुसरा हंबरडा फोडत होता. मात्र, छब्या व सोन्याला एकाच वेळी लंम्पी महामारीने गाठले. अनेक वर्षे ही बैल जोडी पुकळे यांच्या घरी होती. त्यामुळे घरातील माणसापेक्षा या जोडीवर सर्वांचे प्रेम होत. सोन्या व छब्या यांच्या जाण्याने पुकळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घरातील सर्वजण ओक्साबोक्सी रडत आहेत. लंम्पी आजाराने आमच्या दावणीची जनावरे नव्हे तर माणसे गेल्याचे दुःख झाल्याचे उत्तम पुकळे व प्रकाश पुकळे यांनी सांगितले. त्यामुळे जनावरांच्या या आजारावर सरकारने ठोस उपचारासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी पुकळे यांनी केली.

COMMENTS