Homeताज्या बातम्या

जगातील लोकप्रिय फुटबॉल खेळ संगमनेरमध्ये रुजावामाजीमंत्री थोरात ; रिमझिम पावसात संगमनेरकरांनी लुटला ‘फुटबॉल फिव्हर’चा आनंद

संगमनेर : सह्याद्री डोंगराच्या कुशीत आंतरराष्ट्रीय पातळीची फुटबॉल ग्राउंडची साईज ठेवून बनवण्यात आलेल्या नवीन 'लोकनेते बाळासाहेब थोरात फुटबॉल मैदा

वडगाव गुप्ता ग्रामस्थांनी केले सीना नदीचे जलपूजन
नुपूर शर्मा विरुद्ध देशद्रोहाचा खटला दाखल करून अटक करा
गॅझेटच्या आधारावर आरक्षण शक्य नाही : माजी मंत्री बाळासाहेब थोरात


संगमनेर : सह्याद्री डोंगराच्या कुशीत आंतरराष्ट्रीय पातळीची फुटबॉल ग्राउंडची साईज ठेवून बनवण्यात आलेल्या नवीन ‘लोकनेते बाळासाहेब थोरात फुटबॉल मैदानावर’ रिमझिम पावसात भिजत आनंद घेत उपस्थित हजारो संगमनेरकरांनी फुटबॉल फिव्हर 2026 चा आनंद घेतला. याचबरोबर या वेगवान व अचूक खेळाचे जगभरात सर्वाधिक जास्त चाहते असून संगमनेर मधील नागरिकांनी या खेळाचा आनंद घ्यावा व खेळातून अनेक गुणवंत खेळाडू तयार व्हावेत अशी अपेक्षा काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
 वेल्हाळे परिसरात अमृतवाहिनी शिक्षण संस्थेच्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात आंतरराष्ट्रीय साईजचे अद्यावत लोकनेते बाळासाहेब थोरात फुटबॉल मैदानाचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी अत्यंत रिमझिम पावसात संगमनेर फुटबॉल क्लब व एवरेस्ट फुटबॉल क्लब यांच्यामध्ये प्रदर्शनीय सामना झाला. यावेळी माजी शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे, पांडुरंग  घुले, लक्ष्मणराव कुटे, शंकरराव खेमनर, नगराध्यक्ष डॉ.मैथिली तांबे, कार्यकारी विश्वस्त शरयू  देशमुख  यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून आंतरराष्ट्रीय साईज असलेले भव्य फुटबॉल क्रीडांगण बनवण्यात आले आहे. डोंगराच्या कुशीत नैसर्गिक पायर्यांवर अत्यंत सुंदर असणाऱ्या या क्रीडा मैदानाचे उद्घाटन यावेळी माजीमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे यांच्या हस्ते करण्यात आले.  
 यावेळी शुभेच्छा देताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, सध्या जगामध्ये फिफा वर्ल्ड कप सुरू असून संपूर्ण जगामध्ये याचा फीवर आहे. फुटबॉल हा सर्वात वेगवान खेळ असून जगातील सर्वात जास्त देशांमध्ये खेळला जातो. या खेळाची लोकप्रियता मोठी आहे. अत्यंत लहान देशही हा खेळ खेळत असून संकटातील देश सुद्धा या खेळात मोठ्या आनंदाने सहभागी होतात. सध्या फिफाच्या वर्ल्डकप मुळे जगाला या खेळाची मोठ्या आनंदाची पर्वणी सुरू आहे. कार्यक्रमानंतर खेळातील सहभागी सर्व खेळाडूंना मेडल देऊन गौरविण्यात आले.

COMMENTS