बीड : मौलाना आझाद सामाजिक फाउंडेशनची महत्त्वपूर्ण बैठक संस्थापक अध्यक्ष अरफात खान यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. बैठकीचे मार्गदर्शन राज्य प्रवक्त

बीड : मौलाना आझाद सामाजिक फाउंडेशनची महत्त्वपूर्ण बैठक संस्थापक अध्यक्ष अरफात खान यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. बैठकीचे मार्गदर्शन राज्य प्रवक्ता मुशीर भाई इनामदार यांनी केले, तर अध्यक्षस्थानी खदीरुज्जमा खान होते. यावेळी फाउंडेशनच्या संघटन विस्तारासह आगामी सामाजिक कार्य आणि सदस्य नोंदणी अभियानाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. फाउंडेशनच्या सदस्य नोंदणी अभियानाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून अनेक नागरिकांनी सदस्यत्वाचे फॉर्म भरून फाउंडेशनशी जोडले जाण्याची इच्छा व्यक्त केली. आगामी काळात बीड शहरासह तालुका व ग्रामीण भागातही सदस्य नोंदणी अभियान व्यापक करून फाउंडेशनचे कार्य तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा निर्णय घेण्यात आला. समाजातील विविध घटकांना फाउंडेशनच्या सामाजिक कार्याशी जोडण्यासाठी स्टुडंट्स विंग, युवक विंग आणि ज्येष्ठ नागरिक विंग स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या माध्यमातून विद्यार्थी, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांना सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी करून घेण्यात येणार आहे. यावेळी सचिव सय्यद सलमान यांनी फाउंडेशनने आतापर्यंत केलेल्या विविध सामाजिक कार्याची माहिती उपस्थितांना दिली. फाउंडेशनच्या आगामी उपक्रमांसाठी आवश्यक नियोजन व संघटनात्मक बांधणीबाबत कोषाध्यक्ष वाजेद मोमिन यांनी आपले विचार मांडले. उपाध्यक्ष शेख इरफान यांनी समाजातील गरजू नागरिकांपर्यंत फाउंडेशनचे कार्य पोहोचविण्याची गरज व्यक्त केली. काजी मुहीबुर रहमान (आमेर) यांनी फाउंडेशनचे सामाजिक कार्य अधिक व्यापक करण्यासाठी तळागाळातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात संघटनेशी जोडण्यावर भर दिला. शेख एहतेशाम यांनी आगामी काळातील संघटन विस्तार, सदस्य नोंदणी तसेच तालुका व ग्रामीण भागात फाउंडेशनची सदस्यसंख्या वाढविण्याबाबत आपले विचार व्यक्त केले. अध्यक्षस्थानी खदीरुज्जमा खान यांनी फाउंडेशनच्या सामाजिक कार्याला व्यापक स्वरूप देण्यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. तर मार्गदर्शन करताना राज्य प्रवक्ता मुशीर भाई इनामदार यांनी फाउंडेशनचे सामाजिक कार्य अधिक प्रभावीपणे समाजातील गरजू घटकांपर्यंत पोहोचविण्याचा निर्धार व्यक्त केला. बैठकीला मौलाना आझाद सामाजिक फाउंडेशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आगामी काळात शहरासह तालुका व ग्रामीण भागात संघटन विस्तार करून अधिकाधिक नागरिकांना फाउंडेशनशी जोडण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

COMMENTS