Homeताज्या बातम्या

बाजरी, मका उत्पादक शेतकर्‍यांनी एकात्मिक अन्नद्रव्य व कीड व्यवस्थापनासाठी अर्ज करावेत

बीड : सन 2026-27 च्या खरीप हंगामात बाजरी व मका पिकांची पेरणी केलेल्या बीड जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान-अन्नधान्य

विजेचा धक्का लागून शेतकऱ्याचा मृत्यू
सरसकट कर्जमाफीसाठी नगर-मनमाड महामार्गावर चक्काजाम  शिंदे शिवसेना शेतकरी सेनेचे राहुरीत आंदोलन
कर्जमाफीत शेतकऱ्यांची संतापजनक फसवणूक
Fodder Crop : जनावरांची हिरव्या चाऱ्याची गरज भागविण्यासाठी बाजरी, मका  लागवड|Bajara, maize cultivation to meet the green fodder needs of the  animals

बीड : सन 2026-27 च्या खरीप हंगामात बाजरी व मका पिकांची पेरणी केलेल्या बीड जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान-अन्नधान्य पिके योजनेंतर्गत प्रकल्पाबाहेरील एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन व एकात्मिक कीड व्यवस्थापन या बाबींचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे यांनी केले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित शेतकर्‍याने खरीप हंगामात बाजरी किंवा मका पिकाची पेरणी केलेली असणे आवश्यक आहे. तसेच कृषी विद्यापीठाने संबंधित पिकासाठी शिफारस केलेल्या निविष्ठा व औषधांचा वापर करणे आवश्यक असून, लाभार्थी शेतकर्‍याच्या नावावर संबंधित क्षेत्र असणे गरजेचे आहे. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन व एकात्मिक कीड व्यवस्थापनासाठी शेतकर्‍यांनी स्वतःच्या पसंतीने खुल्या बाजारातून शिफारस केलेल्या निविष्ठांची खरेदी करणे आवश्यक आहे. खरेदी केलेल्या निविष्ठांच्या रकमेच्या 50 टक्के किंवा प्रति हेक्टरी 2,500 रुपये, यापैकी जी रक्कम कमी असेल ती अनुदान म्हणून लाभार्थी शेतकर्‍याच्या आधार संलग्न राष्ट्रीयीकृत बँक खात्यात थेट जमा करण्यात येणार आहे. प्रत्येक शेतकरी एका हंगामात एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि एकात्मिक कीड व्यवस्थापन या दोन्ही बाबींसाठी प्रत्येकी जास्तीत जास्त 2 हेक्टर क्षेत्रापर्यंत लाभ घेण्यास पात्र राहणार आहे. बाजरी व मका पिकासाठी वापरण्यात आलेल्या शिफारस केलेल्या निविष्ठांची खरेदी केलेली बिले संबंधित कृषी सहाय्यकांमार्फत तालुका कृषी कार्यालयात जमा करून शेतकर्‍यांनी योजनेतील प्रकल्पाबाहेरील एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन व एकात्मिक कीड व्यवस्थापन या बाबींच्या अनुदानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

COMMENTS