Homeताज्या बातम्या

गेवराईच्या नव्या तहसीलदार म्हणून गीतांजली गरड यांनी स्वीकारला पदभार

चकलांबा : गेवराईच्या तहसीलदारपदी गीतांजली गरड यांनी गुरुवारी, दि. 6 ऑगस्ट रोजी पदभार स्वीकारला. शहरात दाखल झालेल्या गजानन महाराज पालखीचे स्वागत क

मोमीन युसरा फातेमा जफर अहेमद दहावी बोर्ड परीक्षेत 93 टक्के गुणांसह शाळेत प्रथमनगराध्यक्षा प्रेमलताताई पारवे यांच्या हस्ते सत्कार
घाटसावळीत नशामुक्त भारत अभियान सप्ताहाचा उत्साहात समारोपव्यसनमुक्ती काळाची गरज : प्रा. आजिनाथ शेरकर
जनगणना 2026 मध्ये प्रत्येकाने सहभाग नोंदवावा; ही सामाजिक जबाबदारी – शेख युनूस

चकलांबा : गेवराईच्या तहसीलदारपदी गीतांजली गरड यांनी गुरुवारी, दि. 6 ऑगस्ट रोजी पदभार स्वीकारला. शहरात दाखल झालेल्या गजानन महाराज पालखीचे स्वागत करून त्यांनी आपल्या प्रशासकीय कामकाजाला सुरुवात केली. कथित वाळू चोरी प्रकरणात 19 जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाल्यानंतर तत्कालीन तहसीलदार संदीप खोमणे यांच्यावरही आरोप झाले होते. त्यानंतर ते रजेवर गेले होते. त्यामुळे तहसीलदार पदाचा अतिरिक्त कार्यभार कर्तव्यदक्ष नायब तहसीलदार संजय सोनवणे यांच्याकडे सोपविण्यात आला होता. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर येथून आलेल्या गीतांजली गरड यांनी गुरुवारी गेवराई तहसीलदार पदाची सूत्रे स्वीकारली. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी प्रशासकीय कामकाजाला सुरुवात केली असून, महसूल विभागाशी संबंधित प्रलंबित प्रश्न आणि नागरिकांच्या अडचणी सोडविण्यास प्राधान्य देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

COMMENTS