Homeताज्या बातम्या

बीड शहरातील अतिक्रमण हटवून वाहतूक व्यवस्था सुरळीत करणार्‍या पोलिस अधिकार्‍यांचा सामाजिक कार्यकर्त्यांकडून सत्कार

बीड : शहरातील वाहतूक कोंडी कमी करून नागरिकांना दिलासा मिळावा तसेच रस्त्यांवरील अतिक्रमण हटवून वाहतूक व्यवस्था अधिक शिस्तबद्ध व सुरळीत करण्यासाठी

पाणी-स्वच्छतेची भिक नको परंतु मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करानगरपरिषद कार्यालयासमोर संतप्त सामाजिक कार्यकर्त्यांची  निदर्शने-डॉ.गणेश ढवळे
शिवाजीनगर पोलिसांची कामगिरी; महिलांचे मोबाईल पळवणारी टोळी दोन तासांत गजाआडतीन महिलांना लक्ष्य करणार्‍या अट्टल चोरांकडून 9 मोबाईल जप्त
बीडच्या शिरपेचात मानाचा तुरा: शेख रमशा तस्कीन ’डी.वाय.पाटील’ मधून एमबीबीएस; बोरफडीकर परिवारातील पहिली डॉक्टर!


बीड : शहरातील वाहतूक कोंडी कमी करून नागरिकांना दिलासा मिळावा तसेच रस्त्यांवरील अतिक्रमण हटवून वाहतूक व्यवस्था अधिक शिस्तबद्ध व सुरळीत करण्यासाठी प्रभावी मोहीम राबविणार्‍या जिल्हा वाहतूक शाखेचे प्रभारी पोलिस निरीक्षक वैभव पाटील आणि पोलीस उपनिरीक्षक विजय जाधवर यांचा विविध सामाजिक संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
गेल्या काही दिवसांपासून जिल्हा वाहतूक शाखेच्या वतीने शहरातील प्रमुख मार्गांवरील अतिक्रमण हटविणे, अवैध पार्किंगवर कारवाई करणे, वाहतुकीस अडथळा ठरणार्‍या घटकांवर नियंत्रण ठेवणे तसेच नागरिकांमध्ये वाहतूक नियमांविषयी जनजागृती करणे अशा विविध उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यात आल्या आहेत. या मोहिमेमुळे शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक गतिमान, सुरक्षित आणि शिस्तबद्ध होण्यास मदत झाली असून नागरिकांकडून या उपक्रमाचे स्वागत करण्यात येत आहे. या उल्लेखनीय कार्याची दखल घेत मातृभूमी प्रतिष्ठान, लेक लाडकी अभियान बीड जिल्हा, महा एनजीओ फेडरेशन महाराष्ट्र राज्य तसेच विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात वाहतूक व्यवस्थेतील सुधारणा आणि पोलिस प्रशासनाच्या लोकाभिमुख कार्यपद्धतीबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले. यावेळी मातृभूमी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय तांदळे, लेक लाडकी अभियानाचे बाजीराव ढाकणे, बीड शहर बचाव मंचचे नितीन जायभाये, सेवानिवृत्त मुख्याध्यापिका कमलताई लांडगे, सामाजिक कार्यकर्त्या मिराताई डावकर, आम्रपाली साबळे, ज्येष्ठ समाजसेवक सुधीर देशमुख यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थितांनी वाहतूक शिस्त ही केवळ पोलिस प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाने वाहतूक नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. शहर स्वच्छ, सुंदर आणि वाहतूक कोंडीमुक्त ठेवण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करण्याचे आवाहनही करण्यात आले. सत्काराला उत्तर देताना पोलिस निरीक्षक वैभव पाटील यांनी सांगितले की, बीड शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम, सुरक्षित आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी प्रशासन सातत्याने कार्यरत राहील. नागरिकांचे सहकार्य लाभल्यास शहर वाहतूक कोंडीमुक्त करण्याचे उद्दिष्ट निश्चितपणे साध्य होईल. तर पोलीस उपनिरीक्षक विजय जाधवर यांनी नागरिकांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे आणि सहकार्यामुळेच अशा मोहिमा यशस्वी होत असल्याचे नमूद केले. भविष्यातही वाहतूक व्यवस्थेतील समस्या दूर करण्यासाठी कठोर तसेच लोकहिताच्या उपाययोजना राबविण्यात येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या सत्कार सोहळ्यामुळे पोलिस प्रशासन आणि सामाजिक संघटनांमधील समन्वय अधिक दृढ झाला असून शहराच्या विकासासाठी प्रशासन आणि नागरिकांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज अधोरेखित झाली.

COMMENTS