Homeताज्या बातम्या

भीषण अपघातानंतर बस पेटली  सात जणांचा होरपळून मृत्यू, धुळे महार्गावरील दुर्घटना

सुरत : गुजरातमधील सुरत जिल्ह्यात धुळे–सुरत महामार्गावर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या दोन बसमध्ये झालेल्या भीषण अपघातात सात जणांचा हो

तिहेरी अपघातात सहा जणांचा मृत्यूअंमळनेरजवळील घटना ; मृतांमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांचा समावेश
वशाल अग्रवाल यांना तो व्हिडिओ भोवणार
मुंबईत दादर प्लाझाजवळ बसचा अपघात, नियंत्रण सुटलेल्या बसने पादचाऱ्यांसह वाहनांना चिरडल्याने 2 मृत्यू!


सुरत : गुजरातमधील सुरत जिल्ह्यात धुळे–सुरत महामार्गावर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या दोन बसमध्ये झालेल्या भीषण अपघातात सात जणांचा होरपळून मृत्यू झाला. अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.
बार्डोली तालुक्यातील उवा आणि मानेकपूर गावांदरम्यान हा अपघात घडला. धुळ्याहून नवापूरमार्गे सुरतकडे जाणारी राज्य परिवहन बस आणि समोरून येणारी दुसरी बस यांच्यात जोरदार धडक झाली. धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की, एक बस रस्त्यावर उलटली. त्यानंतर बसने पेट घेतल्याने प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला.
अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलिस यंत्रणा आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाने अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळविले. त्यानंतर बचाव पथकांनी बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
या दुर्घटनेत सात जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांपैकी सहा जणांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी बार्डोली येथील रुग्णालयात पाठविण्यात आले. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या अपघातामुळे धुळे–सुरत महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळित झाली होती. दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अपघातग्रस्त वाहने बाजूला करून पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.
धडकेनंतर बसने घेतला पेट
दोन बसमधील समोरासमोरच्या धडकेनंतर एक बस उलटली आणि क्षणार्धात तिला आग लागली. आगीने काही मिनिटांतच रौद्र रूप धारण केल्याने अनेक प्रवाशांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

COMMENTS