Homeताज्या बातम्या

परभणीत भीषण अपघात; चार तरुणांचा जागीच मृत्यू

परभणी : परभणी-पाथरी राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी रात्री उशिरा खाजगी बस आणि दुचाकीमध्ये झालेल्या एका भीषण अपघातात ४ तरुणांचा जागीच मृत्यू झाला

जालना-नांदेड समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांची बाभुळगाव फाट्यावर बैठक; वाढीव संपादनाचे पोल उपटून फेकले, १८ जूनला रास्ता रोकोचा इशारा
सरसकट कर्जमाफीसाठी पारनेरमध्ये ‘जनआक्रोश मोर्चा’; खासदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली बैलगाड्या आणि ट्रॅक्टरसह शेतकरी रस्त्यावर
मुदखेड काँग्रेस कमिटी कार्यालयात राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी
Parbhani Highway Accident: ४ ठार | परभणी महामार्गावर ट्रॅव्हल्स-दुचाकीचा भीषण  अपघात, ४ तरुणांचा जागीच मृत्यू

परभणी : परभणी-पाथरी राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी रात्री उशिरा खाजगी बस आणि दुचाकीमध्ये झालेल्या एका भीषण अपघातात ४ तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृत तरुण हे मानवतचे रहिवासी होते. या दुर्दैवी घटनेमुळे मानवत शहरावर शोककळा पसरली आहे.

खाजगी बस शुक्रवारी रात्री १०.३० च्या सुमारास परभणीहून पुण्याच्या दिशेने जात होती. या बसने परभणी-पाथरी राष्ट्रीय महामार्गावरील राहुल जिनिंगसमोर एमएच २२ बीबी ४७२४ (MH 22 BB 4724) क्रमांकाच्या दुचाकीला जोरात धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की, यामध्ये दुचाकीवरील चारही तरुण जागीच ठार झाले.

COMMENTS