टीईटी घोटाळाप्रकरणी माजी मंत्री अब्दुल सत्तारांचा पाय खोलात

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

टीईटी घोटाळाप्रकरणी माजी मंत्री अब्दुल सत्तारांचा पाय खोलात

मुलींची प्रमाणपत्रे रद्द ; विरोधकांकडून टीकेची झोड

औरंगाबाद/प्रतिनिधी : महाराष्ट्र शिक्षक भरती परीक्षा अर्थात टीईटी परीक्षेतील गैरव्यवहारप्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळाचे टीईटी परीक्षा दिलेल्या

कृषीमंत्री सत्तारांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा
मंत्री सत्तारांविरोधात 5 फौजदारी तक्रारी दाखल
कांदा उत्पादकांना 550 कोटींची नुकसान भरपाई

औरंगाबाद/प्रतिनिधी : महाराष्ट्र शिक्षक भरती परीक्षा अर्थात टीईटी परीक्षेतील गैरव्यवहारप्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळाचे टीईटी परीक्षा दिलेल्या सुमारे 7 हजार 874 विद्यार्थ्यांचा नावांची यादी जाहीर करत, त्यांना कायमची परीक्षा बंदी घातली. शिवाय त्यांची टीईटीचे प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय घेतला. या यादीत माजी राज्यमंत्री तथा शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या हिना आणि उझमा या दोन मुलींची नावे समोर आल्यामुळे खळबळ उडाली असून, विरोधकांनी सत्तार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
ात्र यावर मला बदनाम करण्यासाठी हा सगळा प्रकार केल्याचा दावा सत्तार यांनी केला आहे. आता या प्रकरणात शिक्षणाधिकारी पुढे काय कार्यवाही करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात शिक्षक पात्रता परीक्षेत झालेल्या घोटाळ्यात काही जणांना अटक करण्यात आली आहे. अधिक तपासात परीक्षा परिषदेकडून गैरप्रकारात अडकलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीत 7 हजार 874 विद्यार्थ्य्यांच्या नावांचा समावेश आहे. या सर्व विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली आहेत. या यादीत अब्दुल सत्तार यांच्या हीना कौसर अब्दुल सत्तार शेख आणि उझमा नाहीद अब्दुल सत्तार शेख या दोन मुलींची नावे आहेत. 102 आणि 104 क्रमांकावर त्यांची नावे आहेत. सत्तार यांच्या सिल्लोडमध्ये सात शैक्षणिक संस्था आहेत. या संस्थांमध्येच या मुलीही शिक्षिका असून त्या अपात्र असल्याचे या यादीत म्हटले आहे. सायबर पोलीस आणि परीक्षा परिषद यांनी जी यादी प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये या दोघींच्या नावांचा समावेश आहे. उझमा आणि हिना यांनी कुठल्या एजंटला पैसे दिले हे मात्र अजून गुलदस्त्यातच आहे. पण दोन्ही मुलींची टीईटी प्रमाणपत्र रद्द करण्यात आली आहेत.

बदनाम करण्याचा हा डाव : अब्दुल सत्तार
यावर सत्तार यांना विचारले असता त्यांनी ही माहिती अयोग्य असल्याचे म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, माझ्या मुलींची नावे या यादीत असण्याचा प्रश्‍नच येत नाही. माझ्या मुली 2020 मध्ये टीईटी अपात्र झाल्या आहेत. त्याचे पुरावे माझ्याजवळ आहेत. त्यामुळे मला बदनाम करण्यासाठी हा सगळा प्रकार आहे. माझ्या मुलींनी शाळेत कुठलीही सुविधा घेतलेली नाही, पगार घेतले नाहीत आणि मी स्वतः या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी शासनाकडे करणार आहे. मला बदनाम करण्याचा हा डाव असल्याचेही सत्तार म्हणाले.

चौकशी झाल्यास सत्य बाहेर येईल : चंद्रकांत खैरे
अब्दुल सत्तार यांच्या अनेक शाळा आहेत. या घोटाळ्याची चौकशी केंद्रीय अधिकार्‍यांनी केली आहे. ही चौकशी करतच ते सिल्लोडपर्यंत पोहोचले आहेत. महत्त्वाचं म्हणजे ही शाळा त्यांचीच आहेत. त्यामुळे फक्त त्यांच्याच मुलींचे नावं आहेत, की आणखी मुलींचा समावेश आहे, याची चौकशी व्हायला पाहिजे, अशी मागणी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केली आहे. तसेच भष्ट्राचाराचे आरोप असतानाही शिंदे-फडणवीस सरकारमध्ये त्यांना मंत्री करण्यात येईल का, असा प्रश्‍नही त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारला आहे.

COMMENTS