Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवा : आ. मोनिका राजळे

पाथर्डी : शासनाच्या अनेक योजना असून या योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शासकीय अधिकारी,राजकीय पदाधिकारी यांनी प्रयत्न करायला हवे अशी अपेक्षा आमदार मोनिका राजळे यांनी व्यक्त केली. तालुक्यातील अकोले येथे माजीमंत्री स्व.बबनराव ढाकणे व्यासपीठावर आयोजित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर उदघाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी प्रांताधिकारी प्रसाद मते,तहसीलदार डॉ. उद्धव नाईक,तालुका कृषी अधिकारी महादेव लोंढे,सरपंच जया गर्जे,नारायण पालवे,अशोक चोरमले,सुभाष केकाण,विजय पालवे,भगवान साठे,संपत गर्जे,उद्धव माने,राजेंद्र गर्जे  व सर्व खात्याचे अधिकारी उपस्थित होते. या वेळी इस्रो मध्ये निवड झालेल्या श्रेया देविदास गर्जे हीचा सन्मान करण्यात आला तर अकोले महसूल मंडळातील अधिकाऱ्यांनी अकोले शाळेला पुस्तकांसाठी पाच हजार रुपयांची देणगी दिली.        राजळे म्हणाल्या ग्रामीण भागातील नागरिकांना विविध दाखले घेण्यासाठी पाथर्डी तहसील कार्यालयात यावे लागते मात्र एकदा येऊनही काम होईलच याची खात्री नसल्याने शासनाने हे शिबीर  सुरु केले आहे. या शिबिराला मी येते म्हणून आमचे राजकीय कार्यकर्ते येत असल्याने गर्दी दिसते मात्र तसे न होता लाभार्थी येणे महत्वाचे आहे. राज्याच्या ग्रामविकास विभागाने गावे जोडा ही योजना आणली आहे. या योजनेतून एक हजार लोकवस्ती असलेली गावे दुसऱ्या गावांना रस्त्याच्या माध्यमातून जोडली जाणार आहेत. या योजनेचा लाभ मतदारसंघातील अनेक गावांना कसा भेटेल या साठी सर्वानी काम करणे गरजेचे आहे.                                                                                                                        शासकीय स्तरावर मोठ्या प्रमाणात पेन्डसी निर्माण झाली असल्याने ती कमी करण्यासाठी हे अभियान राबवले जात आहे.तहसील कार्यालयात जनता दरबार भरवून समस्यांचा निपटारा लवकर होत नाही त्या ऐवजी महाराजस्व शिबीर आयोजित करून जनतेचे प्रश्न मार्गी लावता येतात. सध्या आपल्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात हे अभियान राबवले जात आहे. राहुरी पाथर्डी मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाल्याने त्या मतदारसंघात असलेल्या गावात हे शिबीर आयोजित करता येत नसले तरीही आचार संहिता संपताच त्या गावा मध्ये सुद्धा हे अभियान राबवले जाईल. प्रास्ताविक डॉ. उद्धव नाईक, सूत्रसंचालन महेश अंगारखे तर आभार राजेंद्र गर्जे यांनी मानले.

समर्पित नेतृत्वाचे उदाहरण म्हणजे नीलेश लंके; माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे ; पारनेर येथे महाआरोग्य यज्ञ शिबिराचे उदघाटन
संघर्षातूनच यशाचा मार्ग सापडतो : भालेराव
उडदावणे होणार आता मधाचे गाव !शासनाकडून निवड ; ४५ लाखांचा निधी मंजूर

पाथर्डी : शासनाच्या अनेक योजना असून या योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शासकीय अधिकारी,राजकीय पदाधिकारी यांनी प्रयत्न करायला हवे अशी अपेक्षा आमदार मोनिका राजळे यांनी व्यक्त केली. तालुक्यातील अकोले येथे माजीमंत्री स्व.बबनराव ढाकणे व्यासपीठावर आयोजित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर उदघाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.

यावेळी प्रांताधिकारी प्रसाद मते,तहसीलदार डॉ. उद्धव नाईक,तालुका कृषी अधिकारी महादेव लोंढे,सरपंच जया गर्जे,नारायण पालवे,अशोक चोरमले,सुभाष केकाण,विजय पालवे,भगवान साठे,संपत गर्जे,उद्धव माने,राजेंद्र गर्जे  व सर्व खात्याचे अधिकारी उपस्थित होते. या वेळी इस्रो मध्ये निवड झालेल्या श्रेया देविदास गर्जे हीचा सन्मान करण्यात आला तर अकोले महसूल मंडळातील अधिकाऱ्यांनी अकोले शाळेला पुस्तकांसाठी पाच हजार रुपयांची देणगी दिली.      

 राजळे म्हणाल्या ग्रामीण भागातील नागरिकांना विविध दाखले घेण्यासाठी पाथर्डी तहसील कार्यालयात यावे लागते मात्र एकदा येऊनही काम होईलच याची खात्री नसल्याने शासनाने हे शिबीर  सुरु केले आहे. या शिबिराला मी येते म्हणून आमचे राजकीय कार्यकर्ते येत असल्याने गर्दी दिसते मात्र तसे न होता लाभार्थी येणे महत्वाचे आहे. राज्याच्या ग्रामविकास विभागाने गावे जोडा ही योजना आणली आहे. या योजनेतून एक हजार लोकवस्ती असलेली गावे दुसऱ्या गावांना रस्त्याच्या माध्यमातून जोडली जाणार आहेत. या योजनेचा लाभ मतदारसंघातील अनेक गावांना कसा भेटेल या साठी सर्वानी काम करणे गरजेचे आहे.                                                                                                                        शासकीय स्तरावर मोठ्या प्रमाणात पेन्डसी निर्माण झाली असल्याने ती कमी करण्यासाठी हे अभियान राबवले जात आहे.तहसील कार्यालयात जनता दरबार भरवून समस्यांचा निपटारा लवकर होत नाही त्या ऐवजी महाराजस्व शिबीर आयोजित करून जनतेचे प्रश्न मार्गी लावता येतात. सध्या आपल्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात हे अभियान राबवले जात आहे. राहुरी पाथर्डी मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाल्याने त्या मतदारसंघात असलेल्या गावात हे शिबीर आयोजित करता येत नसले तरीही आचार संहिता संपताच त्या गावा मध्ये सुद्धा हे अभियान राबवले जाईल. प्रास्ताविक डॉ. उद्धव नाईक, सूत्रसंचालन महेश अंगारखे तर आभार राजेंद्र गर्जे यांनी मानले.

COMMENTS