Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेवगावात ‘धर्मवीर आनंद दिघे नागरी सहायता कक्षा’चा उद्या प्रारंभ

भातकुडगाव फाटा : शेवगाव तालुक्यात ‘धर्मवीर आनंद दिघे नागरी सहायता कक्षा’चे उद्घाटन  सोमवारी(ता.३०) शिवसेनेचे राज्य सचिव संजय मोरे यांच्या हस्ते होणार आहे. जिल्हा परिषदेच्या माजी सभापती तथा शिवसेना नेत्या हर्षदा काकडे आणि ऍड. शिवाजीराव काकडे यांच्या विशेष पुढाकारातून हा अभिनव उपक्रम तालुक्यात पहिल्यांदाच सुरू होत आहे.  सामान्य माणसाच्या हक्काचे व्यासपीठ उभारणे हे आमचे कर्तव्य आहे. मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली शेवगावमधील प्रत्येक गरजू व्यक्तीला सरकारी योजनांचा थेट लाभ मिळवून देणे, हाच आमचा ध्यास असून या उद्घाटन सोहळ्याला मतदारसंघातील नागरिकांनी आणि लाभार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेना नेत्या हर्षदा काकडे यांनी केले आहे. या सोहळ्याला शिवसेनेचे प्रवक्ते संजीव भोर,उपनेते विजय चौघुले, सेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, जिल्हाध्यक्ष बाबुशेठ टायरवाले आणि प्रचारप्रमुख दिपक जंजिरे आदि प्रमुख उपस्थित राहणार आहेत. काय आहे ‘नागरी सहायता कक्ष’? अनेकदा माहितीअभावी किंवा कागदपत्रांच्या जंजाळामुळे पात्र लाभार्थी सरकारी योजनांपासून वंचित राहतात. ही अडचण दूर करण्यासाठी हा सहायता कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. येथे शेतकरी, महिला, विद्यार्थी, व्यावसायिक, आजारी रुग्ण, ज्येष्ठ नागरिक, बेरोजगार युवक, दिव्यांग आणि महिला बचत गट यांच्यासाठी असलेल्या विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती दिली जाईल. तसेच लाभाच्या मंजुरीसाठी लागणारे तांत्रिक मार्गदर्शन आणि पाठपुरावा करण्याचे काम मोफत केले जाणार आहे.

संघर्षातूनच यशाचा मार्ग सापडतो : भालेराव
शेतकऱ्यांना दिवसा 12 तास मोफत वीज देणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
उडदावणे होणार आता मधाचे गाव !शासनाकडून निवड ; ४५ लाखांचा निधी मंजूर

भातकुडगाव फाटा : शेवगाव तालुक्यात ‘धर्मवीर आनंद दिघे नागरी सहायता कक्षा’चे उद्घाटन  सोमवारी(ता.३०) शिवसेनेचे राज्य सचिव संजय मोरे यांच्या हस्ते होणार आहे. जिल्हा परिषदेच्या माजी सभापती तथा शिवसेना नेत्या हर्षदा काकडे आणि ऍड. शिवाजीराव काकडे यांच्या विशेष पुढाकारातून हा अभिनव उपक्रम तालुक्यात पहिल्यांदाच सुरू होत आहे.

 सामान्य माणसाच्या हक्काचे व्यासपीठ उभारणे हे आमचे कर्तव्य आहे. मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली शेवगावमधील प्रत्येक गरजू व्यक्तीला सरकारी योजनांचा थेट लाभ मिळवून देणे, हाच आमचा ध्यास असून या उद्घाटन सोहळ्याला मतदारसंघातील नागरिकांनी आणि लाभार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेना नेत्या हर्षदा काकडे यांनी केले आहे. या सोहळ्याला शिवसेनेचे प्रवक्ते संजीव भोर,उपनेते विजय चौघुले, सेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, जिल्हाध्यक्ष बाबुशेठ टायरवाले आणि प्रचारप्रमुख दिपक जंजिरे आदि प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

काय आहे ‘नागरी सहायता कक्ष’?

अनेकदा माहितीअभावी किंवा कागदपत्रांच्या जंजाळामुळे पात्र लाभार्थी सरकारी योजनांपासून वंचित राहतात. ही अडचण दूर करण्यासाठी हा सहायता कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. येथे शेतकरी, महिला, विद्यार्थी, व्यावसायिक, आजारी रुग्ण, ज्येष्ठ नागरिक, बेरोजगार युवक, दिव्यांग आणि महिला बचत गट यांच्यासाठी असलेल्या विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती दिली जाईल. तसेच लाभाच्या मंजुरीसाठी लागणारे तांत्रिक मार्गदर्शन आणि पाठपुरावा करण्याचे काम मोफत केले जाणार आहे.

COMMENTS