Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कुकडी आवर्तनाचा दोनच कर्मचाऱ्यांवर ताण; सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; दगडफेकीच्या घटना; पोलीस बंदोबस्ताची मागणी

श्रीगोंदा : तालुक्यात 132 मायनरमधून कुकडीचे उन्हाळी आवर्तन सुरू असून, या कालावधीत केवळ दोनच कर्मचाऱ्यांवर संपूर्ण जबाबदारी पडल्याने ते प्रचंड तणावाखाली काम करत असल्याचे चित्र समोर आले आहे. आवर्तन सुरळीत पार पडण्यासाठी संबंधित ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्याची मागणी जोर धरत आहे. दि. १९ मार्च रोजी घारगाव-बेलवंडी परिसरातून श्रीगोंदेकरांसाठी कुकडी कालव्यातून पाणी सोडण्यात आले. मात्र, या 132 मायनरवर शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी फक्त एक सहाय्यक अभियंता आणि एक दप्तर कारकून असे दोनच कर्मचारी रात्रंदिवस मेहनत घेत आहेत. पाणी वाटप करताना अनेक शेतकरी व पाणी वापर संस्थांकडून दबाव, शिवीगाळ तसेच हल्ल्यांच्या घटनांना त्यांना सामोरे जावे लागत आहे. अधिक पाण्यासाठी काही पाणी वापर संस्थांच्या पदाधिकाऱ्यांकडून दबावतंत्र वापरले जात असल्याने कर्मचारी व संबंधित पदाधिकारी यांच्यात वादाचे प्रकार घडत आहेत. काही ठिकाणी चाऱ्यांचे गेट बंद करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या जेसीबीवर दगडफेक झाल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. त्यामुळे या दोन कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, कुकडी पाटबंधारे विभागात मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची कमतरता जाणवत आहे. पूर्वी २३ कर्मचारी कार्यरत होते, मात्र सध्या फक्त तीनच कर्मचारी उपलब्ध असल्याने कामाचा ताण वाढला आहे. या पार्श्वभूमीवर विसापूर उपविभागीय अधिकारी तसेच कुकडीचे कार्यकारी अभियंता यांनी आवर्तन काळात इतर विभागातून तात्पुरती कर्मचारी नेमणूक करणे आवश्यक होते, मात्र याकडे दुर्लक्ष झाल्याची भावना व्यक्त होत आहे. तसेच, परिस्थिती गंभीर असताना पोलीस बंदोबस्तासाठी स्थानिक पोलीस ठाण्याला पत्र देणे अपेक्षित होते. मात्र, त्याबाबतही कार्यवाही झालेली नसल्याचे समजते. परिणामी कर्मचाऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. गेल्या दोन-तीन दिवसांत या दोन्ही कर्मचाऱ्यांनी शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी संबंधित पाणी वापर संस्थांविरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मात्र, त्यावर अपेक्षित दखल घेतली गेली नसल्याची चर्चा आहे. काही पदाधिकारी स्थानिक राजकीय पाठबळावर दबाव टाकत असल्याचा आरोपही कर्मचारी वर्गातून केला जात आहे. एकूणच, अपुऱ्या मनुष्यबळात जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना तातडीने संरक्षण व अतिरिक्त मदत देण्याची गरज व्यक्त होत आहे.

दीपक शिंदे यांचा श्रीगोंद्यात सत्कार
प्रा. भुजबळ ‘रयत’शी बांधिलकी जपणारे आदर्श शिक्षक : भोस
श्रीगोंदा नगरपालिकेसमोर ठिय्या आंदोलन; नागरी प्रश्नांवर नागरिकांचा संताप

श्रीगोंदा : तालुक्यात 132 मायनरमधून कुकडीचे उन्हाळी आवर्तन सुरू असून, या कालावधीत केवळ दोनच कर्मचाऱ्यांवर संपूर्ण जबाबदारी पडल्याने ते प्रचंड तणावाखाली काम करत असल्याचे चित्र समोर आले आहे. आवर्तन सुरळीत पार पडण्यासाठी संबंधित ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्याची मागणी जोर धरत आहे.

दि. १९ मार्च रोजी घारगाव-बेलवंडी परिसरातून श्रीगोंदेकरांसाठी कुकडी कालव्यातून पाणी सोडण्यात आले. मात्र, या 132 मायनरवर शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी फक्त एक सहाय्यक अभियंता आणि एक दप्तर कारकून असे दोनच कर्मचारी रात्रंदिवस मेहनत घेत आहेत. पाणी वाटप करताना अनेक शेतकरी व पाणी वापर संस्थांकडून दबाव, शिवीगाळ तसेच हल्ल्यांच्या घटनांना त्यांना सामोरे जावे लागत आहे.

अधिक पाण्यासाठी काही पाणी वापर संस्थांच्या पदाधिकाऱ्यांकडून दबावतंत्र वापरले जात असल्याने कर्मचारी व संबंधित पदाधिकारी यांच्यात वादाचे प्रकार घडत आहेत. काही ठिकाणी चाऱ्यांचे गेट बंद करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या जेसीबीवर दगडफेक झाल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. त्यामुळे या दोन कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

दरम्यान, कुकडी पाटबंधारे विभागात मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची कमतरता जाणवत आहे. पूर्वी २३ कर्मचारी कार्यरत होते, मात्र सध्या फक्त तीनच कर्मचारी उपलब्ध असल्याने कामाचा ताण वाढला आहे. या पार्श्वभूमीवर विसापूर उपविभागीय अधिकारी तसेच कुकडीचे कार्यकारी अभियंता यांनी आवर्तन काळात इतर विभागातून तात्पुरती कर्मचारी नेमणूक करणे आवश्यक होते, मात्र याकडे दुर्लक्ष झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

तसेच, परिस्थिती गंभीर असताना पोलीस बंदोबस्तासाठी स्थानिक पोलीस ठाण्याला पत्र देणे अपेक्षित होते. मात्र, त्याबाबतही कार्यवाही झालेली नसल्याचे समजते. परिणामी कर्मचाऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.

गेल्या दोन-तीन दिवसांत या दोन्ही कर्मचाऱ्यांनी शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी संबंधित पाणी वापर संस्थांविरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मात्र, त्यावर अपेक्षित दखल घेतली गेली नसल्याची चर्चा आहे. काही पदाधिकारी स्थानिक राजकीय पाठबळावर दबाव टाकत असल्याचा आरोपही कर्मचारी वर्गातून केला जात आहे.

एकूणच, अपुऱ्या मनुष्यबळात जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना तातडीने संरक्षण व अतिरिक्त मदत देण्याची गरज व्यक्त होत आहे.

COMMENTS