Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पूजा टाक-साळुंखे हिने सर केला नागफणी कडा

लोणंद : पूजा टाक-साळुखे हिने 350 फूट उंचीचा नागफणी कडा सर करत असतानाचा एक क्षण (छाया : सुशिल गायकवाड) लोणंद / प्रतिनिधी : लोणंद, ता. खंडाळा येथील

ऋषभ पंत वर्ल्ड कप आणि आशिया कपमधून बाहेर
ईशांत शर्माच्या घरी झालं गोडस कन्येचं आगमन
यशाच्या शिखरावर असलेल्या टिम इंडियाचा शेअर बाजार एकाएकी कोसळला कसा ?                

लोणंद / प्रतिनिधी : लोणंद, ता. खंडाळा येथील सुकन्या पूजा टाक-साळुंखे हिने महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून 350 फूट उंचीचा नागफणी कडा सर केला असून या खडतर मोहिमेबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. पूजा टाक-साळुंके हिने यापूर्वी ही अनेक मोहीमा यशस्वीपणे पार केल्या आहेत.
नागफणी कडा हा पुणे जिल्ह्यातील लोणावळा लगतच्या कुरवंडे गावाजवळ असून घनदाट जंगलातील खड्या कातळ खडकाचा, चढाईला अतिशय दुर्गम व कठीण आहे. असा हा कठीण असलेला ड्युक नोज उर्फ नागफणी कडा पूजा टाक-साळूंके हिने टीम पॉईंट ब्रेक डव्हेंचुरच्या मदतीने यशस्वीपणे सर केला. या टीमच्या सर्व गिर्यारोहकांचे सहकार्य लाभलेले आहे. सातारा जिल्ह्यातील लोणंदच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला. पूजा हिने आतापर्यंत बरेच कठीण आणि अशक्यप्राय अशा सह्याद्रीच्या मोहिमा पार केल्या आहेत. उन्हाचा प्रचंड मारा असताना फक्त प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर तसेच सतत सराव व पराकोटीची सहनशीलता दाखवत हिने महाराष्ट्र दिन हा एक शौर्य दाखवत आगळ्या वेगळ्या पध्दतीने साजरा केला. पूजा टाक-साळुंके ही नियमितपणे सराव करत असते. त्यामुळे कोणतीही मोहीम सर करताना तिला कोणत्याही अडचणी येत नाही. शिवाय मोहीम यशस्वी पणे पूर्ण होत असते, असे तिने सांगितले आहे.

COMMENTS