Homeताज्या बातम्या

रशियाचा युक्रेनवर भीषण हवाई हल्ला; राजधानी कीव्हसह अनेक शहरे हादरली!

कीव्ह: युक्रेनवरील लष्करी दबाव आणखी तीव्र करत रशियाने गुरुवारी राजधानी कीव्हसह अनेक महत्त्वाच्या शहरांवर क्षेपणास्त्रांचा भीषण मारा केला. या हल्ल

माजी सरपंच सुरेखा न्यारे खून प्रकरणात मोठा ट्विस्ट; अनैतिक संबंध नव्हे, तर ‘या’ आर्थिक कारणातून हत्येचा नातेवाईकांचा दावा!
टेंभुर्णी येथे वारकऱ्यांचा घोंगडी देऊन सन्मान; सुरेंद्रभाऊ थोरात मित्र मंडळाचा स्तुत्य उपक्रम
जनकल्याण मराठी पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी प्रशांत बाफना यांची निवड; अहिल्यानगरमधून कौतुकाचा वर्षाव

कीव्ह: युक्रेनवरील लष्करी दबाव आणखी तीव्र करत रशियाने गुरुवारी राजधानी कीव्हसह अनेक महत्त्वाच्या शहरांवर क्षेपणास्त्रांचा भीषण मारा केला. या हल्ल्यात राजधानीत किमान एका नागरिकाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे, या हल्ल्याच्या काही तासांपूर्वीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी रशिया मोठ्या प्रमाणावर हवाई कारवाई करण्याच्या तयारीत असल्याचा इशारा दिला होता. त्यामुळे त्यांच्या इशाऱ्यानंतर झालेल्या या हल्ल्याने संपूर्ण युक्रेनमध्ये भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

राजधानी कीव्हसह ड्निप्रो आणि क्रिव्ही रिह या शहरांनाही रशियन हल्ल्यांचा मोठा फटका बसला. युक्रेनच्या लष्करी प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, राजधानीवर अल्पावधीत अनेक क्षेपणास्त्रे डागण्यात आली. त्यामुळे शहरातील विविध भागांत स्फोटांचे मोठे आवाज घुमले आणि नागरिकांमध्ये घबराट पसरली. युक्रेनच्या हवाई दलाने दिलेल्या माहितीनुसार, राजधानीच्या दिशेने दुरून लक्ष्य भेदणाऱ्या वेगवान क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात आला. त्याचबरोबर रशियाने लढाऊ विमानांच्या साहाय्यानेही अनेक टप्प्यांत क्षेपणास्त्रे डागल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

पहिल्या हल्ल्यांतरही आणखी क्षेपणास्त्रे राजधानीच्या दिशेने येत असल्याचा इशारा देण्यात आला होता. त्यामुळे संपूर्ण शहरात धोक्याचा इशारा देणाऱ्या सायरन यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्या. कीव्हच्या महापौरांनी नागरिकांना अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आणि सुरक्षित निवारा केंद्रांमध्येच थांबण्याचे आवाहन केले आहे. संभाव्य पुढील हल्ल्यांचा धोका अद्याप कायम असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले असून आपत्कालीन पथके विविध भागांत मदतकार्य करत आहेत.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी अलीकडेच युक्रेनमधील लष्करी मोहिमेबाबत बोलताना, रशिया आपली निश्चित केलेली उद्दिष्टे पूर्ण करेपर्यंत कारवाई सुरूच ठेवेल, अशी भूमिका पुन्हा एकदा मांडली होती. त्यानंतर अल्पावधीतच झालेल्या या व्यापक हल्ल्यामुळे दोन्ही देशांतील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हल्ल्यापूर्वी राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले होते. युक्रेनच्या हवाई संरक्षण दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रशिया मोठ्या प्रमाणावर हल्ल्याची तयारी करत असल्याची माहिती दिल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे आणि धोक्याचा इशारा मिळताच तातडीने सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, असा सल्ला त्यांनी दिला होता.

COMMENTS