Homeताज्या बातम्या

न्यायालयाच्या मनाईनंतरही ‘बेस्ट’चा चक्का जाम! २३ हजार कर्मचारी मध्यरात्रीपासून संपावर

https://www.youtube.com/watch?v=W4eWSEVOKMQ मुंबईकरांसाठी आजची सकाळ अत्यंत मनस्ताप देणारी ठरली आहे. न्यायालयाच्या अंतरिम आदेशाला बाजूला सारत

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; खोपोलीजवळ दोन ट्रकचा भीषण थरार, २ जणांचा जागीच मृत्यू!
मुंबई-आग्रा महामार्गावरील लाळींग घाटात भीषण अपघात; अपघात ३ वाहने एकमेकांवर आदळली
पुण्यातील नवले पुलावर ३ ट्रकचा विचित्र अपघात, एकाचा जागीच मृत्यू; जखमींना वाचवण्याऐवजी आंब्यांची लूट

मुंबईकरांसाठी आजची सकाळ अत्यंत मनस्ताप देणारी ठरली आहे. न्यायालयाच्या अंतरिम आदेशाला बाजूला सारत बेस्टच्या तब्बल २३ हजार कर्मचाऱ्यांनी काल मध्यरात्री १२ वाजेपासून बेमुदत संपाची हाक दिली आहे. यामुळे मुंबईची दुसरी जीवनवाहिनी समजली जाणारी ‘बेस्ट’ सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली असून लाखो प्रवाशांचे हाल होत आहेत.
औद्योगिक न्यायालयाने काल संध्याकाळीच बेस्ट प्रशासनाच्या बाजूने अंतरिम आदेश देत कामगारांना संप करण्यास तात्पुरती मनाई केली होती. मात्र, प्रशासनाच्या वेळकाढू धोरणाला कंटाळलेल्या ‘बेस्ट कामगार संयुक्त कृती समिती’ने संपाचे हत्यार उपसले आहे. शशांक राव आणि प्रसाद लाड यांच्या संघटनांनी संप मागे घेण्याचे आवाहन केले असले, तरी वाहतूक आणि वीज विभागातील हजारो कर्मचारी उत्स्फूर्तपणे संपात उतरल्याने मुंबईतील बेस्ट सेवा जवळजवळ ठप्प झाली आहे.
या संपाची पूर्वकल्पना नसलेल्या मुंबईकरांना ऐन सकाळी कामावर निघताना मोठा फटका बसला. बस थांब्यांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत असून ऑटोरिक्षा, टॅक्सी आणि लोकल ट्रेनवरील ताण कमालीचा वाढला आहे. केवळ वाहतूकच नाही, तर वीज विभागाचे कर्मचारीही संपात असल्याने मुंबईतील वीजपुरवठा व्यवस्थेवरही याचा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

COMMENTS