Homeताज्या बातम्याक्रीडा

भारताचा ‘यशस्वी’ विजय

बॅझबॉल तंत्रासह इंग्लंडला लोळवले

राजकोट ः इंग्लंड आणि भारतामध्ये सुरू असलेल्या तिसर्‍या कसोटीत राजकोटच्या मैदानावर यशस्वी नावाचे वादळ चांगलंच घोंघावले. यशस्वी जैस्वालने द्विशतक झ

विरुष्का दुसऱ्यांदा झाले आई-बाबा
चेन्नई सुपर किंग्जचा स्टार खेळाडू तुषार देशपांडेचा झाला साखरपुडा
सौदी अरेबियात अमिताभ बच्चन यांनी घेतली मेस्सी-रोनाल्डोची भेट

राजकोट ः इंग्लंड आणि भारतामध्ये सुरू असलेल्या तिसर्‍या कसोटीत राजकोटच्या मैदानावर यशस्वी नावाचे वादळ चांगलंच घोंघावले. यशस्वी जैस्वालने द्विशतक झळकावल्यानंतर भारतीय गोलदांजांनी इंग्लंडच्या टीमला अवघ्या 122 धावांमध्ये गुंडाळत तिसर्‍या कसोटीमध्ये विजय नोंदवला.
इंग्लंड आणि टीम इंडियामध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेच्या तिसर्‍या कसोटी सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडला धूळ चारली आहे. टीम इंडियाने दिलेल्या आव्हानांचा पाठलाग करण्यासाठी उतरेलल्या इंग्लंडच्या फलंदाजांना भारताच्या गोलंदाजांनी चांगलंच लोळवलं. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी इंग्लंडला 122 धावांमध्ये गुंडाळलं. त्यानंतर टीम इंडियाने 434 धावांच्या फरकाने सामना जिंकला.  टीम इंडियाने इंग्लंडला पराभूत करत मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली आहे. मालिकेचा चौथा सामना 23 फेब्रुवारीला रांचीला होणार आहे. तिसर्‍या कसोटी सामन्यात चौथ्या दिवशी देखील भारतीय फलंदाजांचा झंझावात सुरूच असून यशस्वी जैस्वालने भीम पराक्रम केला आहे. अवघ्या 23 व्या वर्षी डब्बल सेंच्युरी ठोकत त्यांने क्रिकेट चाहत्यांची मने जिंकली आहेत.  सलामीवीर यशस्वी जैस्वालने तिसर्‍या दिवशी शतक पूर्ण केले तर चौथ्या दिवशी द्विशतकाला गवसणी घातली. इंग्लड विरुद्ध दोन डबल सेंच्यूरी ठोकणार यशस्वी पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. यशस्वी जैस्वालने 10 षटकार आणि 14 चौकारांच्या मदतीने 200 धावांचा आकडा पार केला. तर या सामन्यात इंग्लंडला 557 धावांचे लक्ष्य मिळाले होते. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ 122 धावांवर गारद झाला. मार्क वुड वगळता इंग्लंडच्या एकाही फलंदाजाला 20 धावांचा आकडा गाठता आला नाही. वुडने 15 चेंडूत 33 धावा केल्या. त्याचवेळी भारताकडून रवींद्र जडेजाने पाच विकेट घेतल्या. याशिवाय कुलदीपला दोन बळी मिळाले. बुमराह आणि अश्‍विनला प्रत्येकी एक विकेट मिळाली. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने 2-1 अशी आघाडी घेतली आहे.

COMMENTS