Homeताज्या बातम्या

मुदखेड पोलिसांची मोठी कारवाई; ‘ऑपरेशन क्रॅक डाऊन’ अंतर्गत अवैध रेतीचा टिप्पर जप्त, १० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नांदेड : पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात सुरू असलेल्या 'ऑपरेशन क्रॅक डाऊन' अंतर्गत मुदखेड पोलिसांनी अवैध रेती उत्खनन आणि

स्व.अजितदादांच्या जयंतीनिमित्त आ.पंडित यांच्या पुढाकारातून गेवराईत जनसेवा सप्ताहाचे आयोजनरक्तदान, रेशीम कार्यशाळा, मोफत कृत्रिम अवयव शिबीर, व्याख्यान आदी कार्यक्रमांचे आयोजन‘अजितदादा प्रेमींनी’ जनसेवा सप्ताहातील कार्यक्रमास उपस्थित रहावे – आ. विजयसिंह पंडित
नांदेड जिल्ह्यात अवैध वाळू चोरून नेणारा ट्रॅक्टर जप्त; सिंदखेड पोलिसांची धडक कारवाई, ४.०५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
अवैध रेती वाहतुकीवर भाग्यनगर पोलिसांची कारवाई; टिप्परसह 5.65 लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड : पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात सुरू असलेल्या ‘ऑपरेशन क्रॅक डाऊन’ अंतर्गत मुदखेड पोलिसांनी अवैध रेती उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई केली आहे. या कारवाईत गोदावरी नदीच्या पात्रातून विनापरवाना बेकायदेशीररीत्या रेती चोरून नेणारा एक टिप्पर पकडण्यात आला असून, एकूण १० लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुदखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धीरज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखालील विशेष पथक गस्त घालत असताना मौजे खुजडा शिवारातून अवैध रेती घेऊन एक टिप्पर येत असल्याची गुप्त माहिती मिळाली. पोलिसांनी तातडीने खुजडा चौक येथे सापळा रचून संशयास्पद टिप्पर (क्र. MH-22-AA-4477) थांबवला. वाहनाची तपासणी केली असता, चालकाकडे रेती वाहतुकीचा कोणताही कायदेशीर परवाना किंवा रॉयल्टी पावती आढळून आली नाही.

या टिप्परमध्ये गोदावरी नदीच्या पात्रातून चोरलेली १० हजार रुपये किमतीची दोन ब्रास रेती आणि वाहतुकीसाठी वापरलेला १० लाख रुपयांचा टिप्पर पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी पोलीस हवालदार दिलीप चक्रधर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चालक पुंडलिक गजानन वहिंदे (वय ३९, रा. हंगीरगा, ता. उमरी) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) आणि महाराष्ट्र महसूल अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार प्रकाश सुनकूमवार या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

COMMENTS