Homeताज्या बातम्या

पुण्यातील घरांच्या स्वप्नांना नांदेडमध्येच दिशा; गोदरेज प्रॉपर्टी एक्सपोला उत्स्फूर्त प्रतिसाद

नांदेड : पुण्यातील नामांकित रिअल इस्टेट कंपनी 'गोदरेज प्रॉपर्टीज' यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय प्रॉपर्टी एक्सपोला नांदेडकरांचा

नायगावमधील ‘त्या’ ७ कृषी सेवा केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करा; अन्यथा लातूर कृषी सहसंचालक कार्यालयासमोर जनआंदोलनाचा इशारा
८ महिन्यांपासून वेतन रखडले; जलजीवन-स्वच्छता मिशनच्या १,१३६ कर्मचार्‍यांचे कामबंद आंदोलन, ३ ऑगस्टपासून मुंबईत तीव्र लढ्याचा इशारा
देगलूर-बिलोली मतदारसंघात जनतेचा संताप अनावर! वाळू माफिया, वाढती गुंडगिरी आणि निष्क्रिय लोकप्रतिनिधींमुळे सामान्य नागरिकांचे आयुष्य धोक्यात

नांदेड : पुण्यातील नामांकित रिअल इस्टेट कंपनी ‘गोदरेज प्रॉपर्टीज’ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय प्रॉपर्टी एक्सपोला नांदेडकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्टेडियम रोडवरील हॉटेल स्कायलाईट लॉर्ड इन येथे ३० व ३१ मे रोजी आयोजित या प्रदर्शनात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदवत पुण्यातील निवासी व गुंतवणूक प्रकल्पांची सविस्तर माहिती घेतली.

शिक्षण, उद्योग, आयटी व सॉफ्टवेअर क्षेत्रातील वाढत्या संधींमुळे नांदेडसह मराठवाड्यातील नागरिकांचा पुण्याकडे कल सातत्याने वाढत आहे. हीच गरज ओळखून गोदरेज प्रॉपर्टीजने नांदेडमध्येच प्रॉपर्टी एक्सपो आयोजित करून संभाव्य ग्राहकांना थेट तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करून दिले. सध्या कंपनीचे खराडी, केशवनगर, मगरपट्टा, हिंजवडी फेज-१ आणि फेज-३ सह पुण्यात विविध भागांमध्ये ६ ते ७ महत्त्वाचे निवासी प्रकल्प सुरू आहेत.

या एक्सपोदरम्यान नांदेडकरांसाठी विशेष ‘प्राईस बेनिफिट’ आणि आकर्षक सवलतींची घोषणा करण्यात आली होती. वेळेअभावी पुण्यात जाऊन प्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी करणे ज्यांना शक्य नाही, अशा नागरिकांना नांदेडमध्येच सर्व माहिती मिळाल्याने दोन दिवसांत सुमारे १५० नागरिकांनी फ्लॅट बुकिंगसाठी नोंदणी केली. ‘द रियालिटी ९’, खराडी (पुणे) येथील चॅनल पार्टनर मंगेश मठपती व सुयोग ताडगावकर यांनी या एक्सपोचे यशस्वी आयोजन केले होते. नांदेड शहरातील इच्छुक नागरिकांना अधिक माहितीसाठी ८४८४०५५१५९ या क्रमांकावर संपर्क करता येईल, अशी माहिती संयोजक मंगेश मठपती यांनी दिली.

COMMENTS