Homeताज्या बातम्या

नांदेड जिल्ह्यात अवैध वाळू चोरून नेणारा ट्रॅक्टर जप्त; सिंदखेड पोलिसांची धडक कारवाई, ४.०५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

माहूर: नांदेड जिल्ह्यात अवैध गौण खनिज उत्खनन आणि रेती वाहतुकीविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत सिंदखेड पोलिसांनी मोठी कारवाई करत परवान्या

तार गोठ्यावर पडल्याने आठ गायींचा मृत्यू; देवळाली प्रवरा जवळील काळे वस्तीवरील दुर्दैवी घटना
हिंदू खाटीक समाजासाठी कर्ज व अनुदान योजनांसाठी अर्ज मागविले; नांदेड जिल्हा कार्यालयाचे आवाहन
अंबाजोगाईत एमएसईबीचा डोळे असून आंधळा कारभार! नगरपरिषद परिसरातील डीपीवरील अतिरिक्त भारामुळे व्यावसायिकांचे मोठे नुकसान
Illegal sand transport nanded: सिंदखेड पोलिसांची अवैध रेती वाहतुकीवर कारवाई;  ४.०५ लाखांचा ट्रॅक्टरसह मुद्देमाल जप्त

माहूर: नांदेड जिल्ह्यात अवैध गौण खनिज उत्खनन आणि रेती वाहतुकीविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत सिंदखेड पोलिसांनी मोठी कारवाई करत परवान्याविना रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त केला. या कारवाईत ट्रॅक्टर, ट्रॉली आणि एक ब्रास रेतीसह एकूण ४ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधित चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप आणि जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभर अवैध गौण खनिज उत्खनन व रेती वाहतुकीविरोधात विशेष मोहीम सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत १८ जुलै २०२६ रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जोंधळे हे पथकासह पेट्रोलिंग करत असताना सिंदखेड-लोकरवाडी मार्गावरील मनीरामथड धरणाच्या खालील नाल्यातून संशयास्पदरीत्या येणारा ट्रॅक्टर आढळून आला.

पोलिसांनी ट्रॅक्टर अडवून तपासणी केली असता एमएच-२९-बीसी-६३८१ क्रमांकाच्या महिंद्रा ५८५ डीआय ट्रॅक्टरमध्ये सुमारे एक ब्रास अवैध रेती आढळून आली. चालक प्रमोद दत्ता मुरके (वय ३८, रा. सिंदखेड, ता. माहूर) याच्याकडे रेती वाहतुकीसाठी आवश्यक परवाना अथवा वैध कागदपत्रे नसल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. या कारवाईत सुमारे ४ लाख रुपयांचा ट्रॅक्टर व ट्रॉली तसेच ५ हजार रुपयांची एक ब्रास रेती असा एकूण ४.०५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी सिंदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७५/२०२६ नोंद करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३०३(२) तसेच खाण व खनिज अधिनियम, १९५७ मधील कलम ४ व २१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक कोंडापलकुलवार करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील आणि उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार भोंडवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जोंधळे व सहकाऱ्यांनी पार पाडली.

अवैध रेती वाहतुकीविरोधात पोलिसांचा इशारा

जिल्ह्यात अवैध गौण खनिज उत्खनन व रेती वाहतुकीविरोधातील मोहीम अधिक तीव्र करण्यात आली असून, परवान्याविना रेतीची वाहतूक करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

COMMENTS