राष्ट्रवादीच्या महिलांनी रस्त्यावर थापल्या भाकर ; महागाईचा केला अनोखा निषेध

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राष्ट्रवादीच्या महिलांनी रस्त्यावर थापल्या भाकर ; महागाईचा केला अनोखा निषेध

अहमदनगर/प्रतिनिधी : केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात केलेल्या 50 रुपयांच्या वाढीचा निषेध शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने गुरुवारी अ

महात्मा ज्योतीबा फुलेची जयंती साधेपणाणे साजरी करा – काळे
एकलहरे शिवारात धाडसी दरोडा ; एकाचा खून
जागतिक पातळीवर नगरचा झेंडा फडकवताना नगरी नगरकरांना मायभूमीच्या ऋणातून उतराई होण्याचा ध्यास-पदमश्री पोपटराव पवार

अहमदनगर/प्रतिनिधी : केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात केलेल्या 50 रुपयांच्या वाढीचा निषेध शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने गुरुवारी अनोख्या पद्धतीने करण्यात आला. वाढत्या महागाई विरोधात भर रस्त्यावर चूल पेटवून भाकर्‍या थापण्याचे आंदोलन महिलांनी केले व केंद्र सरकारविरुद्ध बोंबही ठोकली. घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत पन्नास रुपयांनी वाढ केल्यामुळे केंद्र सरकारच्या निषेधार्थ चूल पेटवून त्यावर स्वयंपाक करण्यात आला. झुटा वादा…महेंगाई जादा…, दैव देते आणि केंद्र सरकार नेते…,बहोत हुई महेंगाई की मार..बस करो मोदी सरकार…अशा आशयाचे फलकही या आंदोलनाच्यावेळी झळकावण्यात आले. या आंदोलनात राष्ट्रवादी महिला शहर जिल्हाध्यक्ष रेश्माताई आठरे, लता गायकवाड, रेणुका पुंड, शीतल गाडे, नंदा पांडुळे, उषा मकासरे, निर्मला जाधव, गीता कामंत, शालिनी राठोड, वैशाली गुंड, सुनंदा कांबळे, सुनीता पाचरणे आदी सहभागी झाल्या होत्या.

मोदी सरकारवर टीका
या आंदोलनाच्यावेळी मोदी सरकारवर टीका करण्यात आली. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे दिवसेंदिवस वाढणार्‍या महागाईमुळे सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल होत आहे. आधीच महागाईमध्ये होरपळत असलेल्या जनतेला केंद्र सरकारने पुन्हा एकदा धक्का दिला. घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत 50 रुपयाने वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे एका सिलेंडर साठी नागरिकांना 1 हजार 53 रुपये मोजावे लागणार आहे. त्यामुळे कुटुंबाचे बजेट कोलमडले आहे. यापूर्वी मे महिन्यातही गॅसच्या दरात मोठी वाढ करण्यात आली होती. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे आधीच नागरिक त्रस्त आहे. याचबरोबर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीतही भरमसाठ वाढ झाली आहे. या वाढत्या महागाईने सर्वसामान्य नागरिक बेजार झाला. मात्र, केंद्र सरकार महागाई कमी करण्याऐवजी नव्हे तर जादा भाव जाहीर करून सर्वसामान्यांना एका मागून एक महागाईचे धक्के देण्याचे काम करत आहे. या महागाईच्या व केंद्र सरकारच्या विरोधात चूल पेटवून निषेध करण्यात आला असल्याची माहिती महिला शहर जिल्हाध्यक्ष आठरे यांनी दिली.

COMMENTS