Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महावितरणचा ’स्मार्ट’ कारभार, जनता अंधारात लाचार; किनवट-गोकुंद्यात ’मार्च एंड’चा फटका की नियोजनाचा अभाव?

किनवट : हवामानात झालेला किरकोळ बदल, हलकासा वारा आणि पावसाच्या दोन सरी... एवढं निमित्त होताच किनवट आणि गोकुंदा शहराची वीज ’गुल’ होण्याचे सत्र आजही

लोहामध्ये शिवसेनेची सभा की ‘पैशांची जत्रा’? ; शक्तीप्रदर्शनाचा फज्जा उडाल्याची चर्चा
पुण्याऐवजी हडपसर स्थानकावरच मराठवाड्यातील रेल्वे गाड्या थांबवण्यात येणार
हिंद-दी-चादर’ कार्यक्रमानिमित्त नांदेड शहरातील आठवडी बाजार 25 जानेवारी रोजी बंद

किनवट : हवामानात झालेला किरकोळ बदल, हलकासा वारा आणि पावसाच्या दोन सरी… एवढं निमित्त होताच किनवट आणि गोकुंदा शहराची वीज ’गुल’ होण्याचे सत्र आजही कायम आहे. 30 मार्च रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास गेलेली वीज दुसर्‍या दिवशीही ’बेपत्ता’ असल्याने नागरिक आणि व्यापार्‍यांचा संयम आता सुटला आहे. विशेष म्हणजे, मार्च अखेरच्या नावाखाली वसुलीसाठी ग्राहकांच्या मागे लागणारे महावितरण सेवा देण्याच्या बाबतीत मात्र पूर्णपणे अपयशी ठरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
काल रात्री अचानक वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे लहान मुले, वृद्ध आणि रुग्ण यांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागला. उन्हाळ्याची चाहूल लागल्याने वाढलेल्या तापमानात पंखे बंद असल्याने नागरिक रात्रभर डासांच्या विळख्यात जागून काढत होते. स्मार्ट मीटर लावून आधुनिकतेच्या गप्पा मारणारे प्रशासन साध्या पावसाळी वार्‍यातही हतबल का होते? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत., वीज नसल्यामुळे व्यापार्‍यांचेही मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः शीतपेये, दुग्धजन्य पदार्थ आणि फ्रीजवर अवलंबून असणार्‍या व्यवसायांना या खंडित वीज पुरवठ्याचा मोठा फटका बसला. मार्च महिना असल्याने अनेक कामांची लगबग असताना, तासनतास वीज नसल्याने आर्थिक व्यवहारही ठप्प झाले आहेत. वीज नेमकी कशामुळे गेली आणि ती कधी येईल, हे जाणून घेण्यासाठी अनेक जागरूक नागरिकांनी महावितरणच्या संबंधित अधिकार्‍यांना व कर्मचार्‍यांना फोन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, नेहमीप्रमाणे जबाबदारी झटकण्यासाठी अनेकांचे फोन बंद होते, तर काहींनी फोन उचलण्याचे सौजन्यही दाखवले नाही. ग्राहकांकडून सक्तीने वसुली करताना दाखवली जाणारी तत्परता दुरुस्तीच्या कामात का दिसत नाही, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.  एकीकडे ग्राहकांवर सक्तीने स्मार्ट मीटर लादले जात आहेत, अव्वाच्या सव्वा वीज बिले वसूल केली जात आहेत. मात्र, पायाभूत सुविधांची अवस्था एवढी बिकट आहे की, थोडासा पाऊस पडला तरी यंत्रणा कोलमडून पडते. वसुलीसाठी ’ऑनलाईन’ राहणारे महावितरण सेवा देताना ’ऑफलाईन’ का, हाच खरा प्रश्न आहे.

COMMENTS