Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अस्थिव्यंग शाळा बंद करण्याच्या निर्णयाविरोधात कर्मचार्‍यांचे निवेदन

नांदेड : राज्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांना सर्वसमावेशक शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून, विशेष शाळांमधील व

अवकाळी पावसाचा नांदेड जिल्ह्याला तडाखा; नांदला-दिग्रस परिसरात केळी बागांचे मोठे नुकसान
नगदी रक्कम व सोन्याचे दागिने असलेली बॅग प्रामाणिकपणे परत; शंकर कंगारे यांचा माणुसकीचा आदर्श
बळीराजावर अस्मानी संकट…!

नांदेड : राज्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांना सर्वसमावेशक शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून, विशेष शाळांमधील विद्यार्थ्यांचे टप्प्याटप्प्याने सर्वसाधारण शाळांमध्ये समायोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. परंतु अस्थिव्यंग शाळेतील शिक्षक, कर्मचारी यांच्या समायोजना बाबत अद्याप निर्णय झाला नाही. शासनाच्या या धोरणाविरोधात दिव्यांग शाळेतील शिक्षक व कर्मचार्‍यांनी आपल्या न्याय हक्कासाठी निवेदन दिले आहे.
कास्ट्राईब कर्मचारी महासंघ, शाखा दिव्यांग विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने अस्थिव्यंग शाळा बंद करण्याच्या शासन निर्णयाविरोधात सोमवारी नांदेड जिल्हा परिषदेत निवेदन देण्यात आले.दिव्यांग विभागाचे मुख्य संघटक तथा वरिष्ठ उपाध्यक्ष विजयकुमार ढवळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुकावार  यांची भेट घेतली. यावेळी शासनाने घेतलेल्या अस्थिव्यंग शाळा बंद करण्याच्या निर्णयाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. कर्मचार्‍यांचे समायोजन पूर्ण होईपर्यंत त्यांचे वेतन थांबवू नये, तसेच त्यांच्या भवितव्याचा विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा, अशा भावना शासनापर्यंत पोहोचवाव्यात, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी मुकावार  यांनी आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी आहोत, असे आश्वासन देत तात्काळ हे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे वर्ग केले. या प्रसंगी जिल्हाध्यक्ष भीमराव कांबळे  यांच्यासह अस्थिव्यंग शाळेतील अनेक शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS